लिवाइस जीन्सचा संस्थापक लेवी स्टॉस यांचा जन्म २६ फेब्रुवारी १८२९ रोजी झाला.
आज जगभरात सुमारे अर्धी लोकसंख्या जीन्सचा वापर करते. जीन्स एवढी प्रसिद्ध होण्यामागे लेवी स्टॉस या उद्योजकाचा दूरदृष्टिकोन आणि उद्योजकतेचे मोठे योगदान आहे. फॅशनतज्ज्ञ मानतात की, अमेरिकेत पहिल्यांदा जी जीन्स वापरली गेली, तिला लेवी स्ट्रॉसने तयार केले होते. औद्योगिक कामगारांसाठी तयार करण्यात आलेल्या जीन्सने आता संपूर्ण विश्वात मान्यता मिळवली आहे.
त्यांनी १८५३ मध्ये लेवी स्ट्रॉस अॅण्ड कंपनी म्हणजेच लिवाइसची स्थापना केली. यादरम्यान लेवी यांना लाकूडतोडे आणि मजुरांसाठी पॅन्ट बनवण्याचा विचार मनात आला. यासाठी मजबूत प्रकारच्या कच्च्या मालाची आवश्यकता होती. जीन्सच्या मजबुतीसाठी लेवीने जेकब डेविस नावाच्या एका व्यक्तीची मदत घेतली. जेकबने जीन्स पॅन्टच्या कमकुवत भागाला मजबुती देण्यासाठी काही तांब्याच्या वस्तू (आपण जे जीन्सला रिबीट मारलेले बघतो ते) जोडल्या आणि लेवी यांची जीन्स तयार झाली.
ही १८७१ ची गोष्ट होती. दोन वर्षांनंतर डेविस आणि लेवी यांनी एकत्रित नवीन मजबूत डिझाइन्स असलेल्या जीन्सचा २० मे १८७३ ला अमेरिकेत पेटंट करून घेतले. या तारखेपासून घोषणात्मक रूपात जीन्सचा जन्मदिवस मानला जातो. ते आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांनी स्वत:ची कंपनी आणि व्यवसाय चार भाचे यांच्या नावावर करून गेले. त्यावेळेस लेवींची एकूण संपत्ती ही मालमत्ता सहा मिलियन डॉलर एवढी होती.
२६ सप्टेंबर १९०२ रोजी लेवी यांचे निधन झाले.
या जीन्सचा इतिहास सांगणारा ‘लिव्हाईस’ कंपनीने एक महितीपट (डॉक्युमेंटरी) तयार केला आहे. या माहितीपटात कंपनीची शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालू असलेली वाटचाल आणि आयकॉनिक पाचशे जीन्सबद्दलही रंजक माहिती दाखविण्यात आलेली आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply