प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार किरण नगरकर यांचा जन्म २ एप्रिल १९४२ मध्ये मुंबई येथे झाला.
‘सात सक्कं त्रेचाळीस’, ‘रावण अँड एडी’, ‘ककल्ड’, ‘द एक्स्ट्राज’ आदी क्लासिक कादंबऱ्यांनी साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार किरण नगरकर यांचे संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झाले. पुण्याचा फर्ग्यूसनमधून पदवी तर मुंबईच्या एसआयइएस कॉलेजमधून इंग्लिश विषयात पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले. ते मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे कादंबरीकार, नाटककार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे कुटुंब ब्राम्हो समाजाची तत्वे मानणारे होते.
किरण नगरकरांची पहिली कादंबरी १९६७-६८च्या सुमारास ‘अभिरुची’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. नगरकर हे त्यांच्या रोखठोक लिखाणामुळे नेहमी चर्चेत होते. ‘बेडटाइम स्टोरी’ या त्यांच्या नाटकाला काही राजकीय संघटनांनी विरोध केल्यामुळे त्यांच्यावर अनेक वर्षं बंदी होती. ‘कबीराचे काय करायचे’, ‘स्ट्रेंजर अमंग अस’ ही त्यांची नाटकंसुद्धा गाजली. ‘सात सक्कं त्रेचाळीस’, ‘दी एक्स्ट्राज’, ‘प्रतिस्पर्धी’, ‘रावण आणि एडी’ अशी त्यांची पुस्तकं गाजली.
त्यांना ‘ककोल्ड’ कादंबरीबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तसेच जर्मन सरकारने ‘ऑर्डर ऑफ मेरीट’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. किरण नगरकर यांचे ५ सप्टेंबर २०१९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply