नवीन लेखन...

हर मर्ज की दवा…. ज़िंदा तिलिस्मा… 

Living Magic…. Jinda Tilismath…. Pride of Hyderabad
(मराठीत खाली लिहिलंय)

Since last almost 100 years, this great medicine is pride of Hyderabad…. Telangana… Andhra Pradesh and surrounded areas like Marathwada…Sholapur of Maharashtra…. This great herbal Unani medicine was invented by Hakeem Mohammed Moizuddin Farooqui in 1920. Since it is made purely from herbals, it has no side effects, even to a pregnant lady. It is very effective for cold, cough, stomach pain, body pain, throat pain, ear pain, tooth pain. People believe that it is very very effective even on swine flu. For certain pains, people take it with water, milk and get relief. It can be used both ways, for external application as well as internal.

मुंबईहून आमची ट्रान्स्फर झाली आणि आम्ही हैदराबादला आलो. इथलं काहीच माहित नव्हतं. त्यामुळे घराजवळच्या एका छोट्याशा किराणा मालाच्या दुकानातच सारखं जाणं होई. दुकानाचा मालक ‘सादिक’ हा माझ्याच वयाचा आणि खूप भला गृहस्थ. हळूहळू ओळख होत गेली …दृढ देखील झाली. हैदराबादमध्ये कुठे काय मिळेल, या साठी तो माझा गाईड झाला… आणि अजूनही आहे  दोस्ती झालीच होती.

एक दिवस मी दुकानात काहीतरी आणायला गेलो. खूप सर्दी झाली होती आणि त्याच्याकडे गेल्यावर नेमक्या तीन चार शिंका आल्या. तो म्हणाला … साहेब …. ‘जिंदा तिलिस्मा’ ले लो. मला काहीच बोध झाला नाही आणि ते माझ्या चेहेऱ्यावर त्याला बरोबर दिसलं. मग त्याच्यादेखील लक्षात आलं. त्याने सांगितलं की … साहेब … ‘जिंदा तिलिस्मा’ ये हैदराबाद की जबरदस्त दवा है….सालोंसे चलती आ रही है …. हमारे बुजुर्गभी लेते आ रहें हैं … आपका जुकाम पंधरा मिनिट में जायेगा … आणि त्याच्या दुकानातल्या मुलाला पैसे देऊन सांगितलं ते आणायला. त्याने आणल्यावर मला दिलं आणि म्हणाला … ये घर जाके लगाना. मी किंमत बघितली … बहुतेक चाळीस रुपये होते … मी देऊ केले .. पण त्याने घेतले नाहीत … म्हणाला साहेब … कोई ऐसी बाते होती है जो पैंसोसे बहोत दूर होती हैं और होनी भी चाहिये … मी घरी आलो आणि रुमालावर दोन थेंब घेऊन नाकाजवळ नेऊन ते हुंगले … आणि चमत्कार व्हावा … अगदी तसंच झालं …. पंधरा एक मिनिटात गळणारं नाक थांबलं आणि थोडया वेळाने सर्दी पार कुठे पळून गेली कळलंच नाही.

जिंदा तिलिस्मात … खरं तर बोली भाषेत जिंदा तलिस्मा… living magic …. जादुई औषध .. एकही कृत्रिम रसायन न वापरता केलेलं … सगळ्या गोष्टी नैसर्गिक … वनौषधी वापरून केलेल्या … म्हणूनच बहुतेक इथल्या उर्दू-हिंदी बोली भाषेत … हर मर्ज की दवा … इतका हैदराबादच्या जनमनाचा त्यावर विश्वास आहे (जसा आपल्याकडे अमृतांजन … कैलास जीवन यावर असतो तसा). पुढच्या वर्षी बरोबर १०० वर्ष होतील, या युनानी औषधाला. हकिम मोहम्मद मोईझुद्दीन फारुकी यांनी हे जादुई औषध १९२० साली निर्माण केलं आणि त्याचा प्रभाव … करिष्मा थोडा थोडका नाही तर शंभर वर्ष लोकमनावर आहे. सर्दी, कफ, अंगदुखी, डोकेदुखी, दातदुखी, कानदुखी, घसादुखी अगदी पोटदुखी… अशा अनेक छोटया आजारावर हे औषध रामबाण उपाय आहे. इतकंच कशाला स्वाईन फ्लू वर पण ते प्रभावी आहे, असा इथल्या लोकांचा विश्वास आहे. मध्ये हैदराबादमध्ये ही साथ मोठया प्रमाणावर होती. पण जिथे ही कंपनी आहे…साहजिकच गोदामात या वनौषधी साठवलेल्या असतात आणि सगळ्या विस्तृत परिसरात कायम या वनौषधींचा मोठा दरवळ असतो. असं म्हणतात की त्या परिसरात एकही माणसाला या साथीचा प्रादुर्भाव झाला नाही. हे औषध हुंगता येतं … याचे थेंब पाण्यात घालून पोटात देखील घेता येतात. काहीही इतर साइड इफेक्टस अजिबात नाहीत. अगदी गरोदर असलेल्या स्त्रीने घेतलं तरी काहीच साइड इफेक्टस अजिबात नाहीत.

परवा ऑफिसमध्ये मुंबईचा एक ऑफिसर काही महत्वाच्या कामानिमित्त आला. मला भेटायला आला होता. मोठी मिटिंग होती. पण सर्दीने हैराण होता. मी थोडा मोठयाने ओरडलो .. अर्थात माझ्या टीम मधल्या सहकाऱ्यालाच … करुणाकर … जिंदा तलिस्मा प्लिज लाव … समोरच्याला काही कळलं नाही  त्याने आणल्यावर मी त्याचा रुमाल मागितला … आणि त्यावर चार थेंब सोडले … सांगितलं की हे आता थोडा वेळ हुंग … त्याला चहा दिला आणि तो गेला … दुपारी लंचला तो आल्यावर उत्तेजित होऊन म्हणाला … आयला … काय होतं ते … माझी सर्दी पार गेली … मी हसलो … म्हणालो … हैदराबाद का कमाल है … आता मुंबईला परत कधी जर ट्रान्स्फर झाली तर जिंदा तलिस्माच्या पाच छोटया बाटल्या तरी नेईनच .. पण पुढे ते नेहेमी आणण्याची काहीतरी व्यवस्था करायला लागेल … घरात ही नाजूक… अत्तराची असते तशी बाटली असलीच पाहिजे … नसेल तर नक्कीच चुकल्या चुकल्या सारखं होईल ….इतकी त्याची महती मला पटलेली आहे.

— प्रकाश पिटकर

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..