नवीन लेखन...

घरगुती इंधनवायू (एल.पी.जी.)

एल.पी.जी. म्हणजेच ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस’ होय. याचाच अर्थ, द्रवात रूपांतर केलेला वायू होय. हा गॅस प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या हायड्रोकार्बन रसायनांनी युक्त असतो.

द्रवरूप वायू हा मूळ वायूपेक्षा आकाराने २४० पटीने कमी होतो. त्यामुळेच तर, छोट्याशा टाकीत ७००० लिटर गॅस ठासून भरता येतो. द्रवरूपातले त्याचे आकारमान २८ लिटर किंवा १४.२ किलोग्रॅम इतके भरते. पुन्हा, स्टोव्हमध्ये जाळण्यासाठी तो वायुरूपात मिळणे आवश्यक असते. त्यासाठी गॅसटाकीच्या तोंडावर एक रेग्युलेटर (नियंत्रक) बसविलेला असतो. त्यात वैशिष्ट्यपूर्ण झडप असते. नियंत्रक ‘ऑन’ · केला असता, टाकीतला द्रवरूपातला गॅस बाहेर पडतो. त्याच्यावरील दाब कमी झाल्याने तो वायुरूप धारण करतो. तो हवेत मिसळून सुरक्षित रबरी नळीच्या साहाय्याने स्टोव्हपर्यंत पोचतो.

वास्तविक, एल.पी.जी. हा अत्यंत ज्वालाग्राही वायू आहे, पण तो हवेत मिसळला तरच पेट घेऊ शकतो. कारण ज्वलनासाठी त्याला हवेतील ऑक्सिजनची गरज असते. विशेष म्हणजे या वायूला वास नसतो. या वायूची गळती लक्षात येण्यासाठी या वायूत मर्केप्टन नावाचे तीव्र वासाचे वायूरूप रसायन अल्प प्रमाणात मिसळतात. हा वास नाकावरून गेला की समजायचे ‘काहीतरी गडबड आहे आणि गोंधळून न जाता सावधगिरीची उपाययोजना करावी.

या वायूतील प्रोपेन आणि ब्युटेन यांचे प्रमाण ३०: ७० या गुणोत्तरात असते. तो वासरहित तसेच रंगहीन असतो. तो विषारी नाही, तसेच पटकन जळूनही जातो. मात्र, भवतालच्या वातावरणात तो जास्त प्रमाणात मुक्त झाला तर माणूस गुदमरण्याची शक्यता आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून लगेच खिडक्या, दारे उघडी करावीत. ठिणगी पडेल असे विजेचे साधन/ मोबाइल फोन वापरायचे नसते. तसेच पेटती मेणबत्ती अशा ठिकाणी घेऊन जाऊ नये. अन्यथा, हा उपयुक्त वायू धोकादायक ठरतो.

जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..