लुब्ध प्रीतीत भाव लपून आहे
सांग दर्पणा चेहेरा मूक का आहे?
प्राजक्त फुलांत गंध बहरुन आहे
सांग रातराणी हितगून तुझे अबोल का आहे?
प्रत्येक प्रश्नास उत्तर कधीच नसते
सांग सखे मग तू काय शोधत आहे?
नजरेतल्या भावनांचे अर्थ मिटून आहे
नात्यांत प्रेम माया का हरवून आज आहे?
प्रत्येक अर्थाचे पड अंतरात व्यापून आहे
न कळतात जाणिवा माणूस निःशब्द का आहे?
टपोरे चांदणे चंद्र साथीस बहरुन आहे
आकाश पाण्यातले प्रतिबिंब का धूसर आहे?
समजावल्या मनास कितीक मन परी वेडे आहे
स्वैर होते मन अवखळ दोष तनास का लागत आहे?
आयुष्याच्या पटावर डाव रोज नव्याने आहे
का खेळवते नियती विधिलिखित का रुसून आहे?
माझीच मी एकाकी अबोल मिटून आहे
हृदयातल्या भावनांचा का दाह पेटला आहे?
शाश्वत असे न आयुष्यात काही कुठले
परी मन ओले भिजून हरवून कोठे आहे?
एक हास्य गाली अबोल लाजून भाव आहे
सुखाचे धागे भवती दुःख हृदयात का लपून आहे?
आहे असे हे जीवन रोज खेळ रंगतो आहे
न सुटते गणित काही गुणसूत्र सारे चुकून का आहे?
आयुष्य रंगमंच खुला हा नाटकं जीवनी व्यापून आहे
माहीत सारे मनास परी माणूस सुख शोधीत का आहे?
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply