लेखक, गीतकार, दिग्दर्शक, संगीतकार व अभिनेते विवेक आपटे यांचा जन्म २३ डिसेंबर १९५७ रोजी मुंबई येथे झाला.
विवेक आपटे यांचे आई वडील दोघेही शिक्षक होते. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते – दिग्दर्शक विनय आपटे हे त्यांचे बंधू होत.अभिनेता व गायक यशोमान आपटे हे त्यांचे चिरंजीव होत.
विवेक आपटे यांनी गेली तीस हून अधिक वर्षे चित्रपट, जाहीराती, जिंगल्स पबल्सीटी कँम्पेन, एकांकिका, नाटके, मालीकांची शिर्षक गीते, चित्रपट गीते असे भरपुर लेखन केले आहे. त्यांनी क्रिएटिव्ह हेड, प्रसिध्दी हेड संचालक म्हणूनही काम केले आहे.
दिल क्या करे हा हिंदी चित्रपट,बलीदान, हाच सुनबाईचा भाऊ,करायाचे ते दणक्यात,चेकमेट या सारखे मराठी चित्रपट तसेच छत्रपती शिवराय ही हिंदी मालीका,चाळ नावाची वस्ती,प्रभाकर,पार्टनर, पुन्हा पुन्हा प्रपंच,बेधुंद मनाच्या लहरी, या सारख्या मालीका आभाळ माया भाग्यविधाता, अवघाची संसार,गंध फुलांचा गेला सांगुन,दुर्वा,जुळुन येती रेशीम गाठी,खुलता कळी खुलेना, या सारख्या दैनदिन मालीका हमाल दे धमाल,सेम टु सेम, या सारख्या २५ हून अधीक चित्रपटांचे गीत लेखन, निर्णय तुमच्या हाती,आदी पश्च,भगवा,बंधमुक्त, या सारखी नाटके त्यांनी लिहिली आहेत. आजवर त्यांनी ५००० हून अधीक मालकांचे भाग त्यांनी लिहीले आहेत.
नाट्य परिषद, मटा सन्मान, रारा, अल्फा गौरव असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
आपटे यांनी टीव्ही व रेडिओसाठी केलेल्या कित्येक जिंगल्सपैकी रंगोली साडी, अमृत मलम या जिंगल्स खूप प्रसिद्ध झाल्या.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply