साहिर लुधियानवी यांचे खरे नाव अब्दुल हयी.
त्यांचा जन्म ८ मार्च १९२१ रोजी लुधियाना येथे झाला. लुधियानात साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग मुंबईकडे मोर्चा वळवला. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या. मात्र त्या सर्वांमध्ये ज्ञान पीठ पुरस्कार विजेत्या ‘अमृता प्रीतम’ हे नांव सर्वात वर!
नौजवान आणि प्यासा या हिंदी चित्रपटांनंतर साहिर यांनी अख्ख्या भारतालाच वेड लावले. आओ की कोई ख्वाब बुने ही त्यांची कविता अत्यंत सुंदर! तल्खिया, परछाईया व अनेक काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. साहिर यांचे काव्य उच्च दर्जाचे असूनही सुप्रसिद्ध असायचे व आहे. ही दोन टोके जमवणे अनेक कवींना अवघड जाते. मा.गुलजार हे मा.साहिल यांचे काही काळ रूममेट होते असे म्हणतात. सुरुवातीच्या काळात हलाखीची परिस्थिती आणी नंतर पैशाचा नुसता धबधबा यामुळे त्यांचे आयुष्य बरेचसे अनियंत्रीत स्वरुपाचेच होते. त्यांनी आयुष्यात लग्न केले नाही. मात्र या व्यक्तीमत्वावर आणि त्यांच्या काव्यावर अनेक स्त्रियांनी जान कुर्बान करण्यापर्यंत प्रेम केले हे मात्र खरे!
जगातील इतर लोकांवर निस्सीम प्रेम करणारा, अमृता प्रीतम बरोबरील प्रेमप्रकरण गाजवणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील गीते रचणारा, मद्यपान आणि धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा.. …. आणि… यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर ‘लता मंगेशकरांनी’ घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन’च’ घेणारे…मा.साहिर लुधियानवी हे शायर आपल्या सर्वांनाच चित्रपट गीतकार म्हणून अधिक परिचित आहे. जो वादा किया वो निभाना पडेगा, कभी कभी मेरे दिल मे, चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो, तुम न जाने किस जहांमे खो अशी अजरामर गीते साहिर यांनी लिहिलेली आहेत. मा.साहिर लुधियानवी यांचे २५ ऑक्टोबर १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
साहिर लुधियानवी यांची गाणी
https://www.youtube.com/shared?ci=-Le4BMzrr2c
https://www.youtube.com/shared?ci=4Qp_V08TtQI
भारत पाकिस्तानमधील युद्धाबाबत साहिर लुधियानवी यांनी रचलेली कविता
खून अपना हो या पराया हो
नस्ले-आदम का खून है आखिर
जंग मशरिक मे हो कि मगरिब मे (मशरिक = पुर्व, मगरिब = पश्चिम)
अम्ने-आलम का खून है आखिर (अम्ने-आलम = विश्व शान्ती)
बम घरोंपर गिरे के सरहदपर
रूहे-तामीर जख्म खाती है (रूहे-तामीर = निर्मीतीचा आत्मा)
खेत अपने जले कि औरोंके
जस्ति फाकोंसे तिलमिलाती है (जस्ति – जीस्त = जीवन)
इस लिये ए शरीफ इन्सानो
जंग टलती रहे तो बेहतर है
आप और हम सभीके आंगनमे
शम्मअ जलती रहे तो बेहतर है
Leave a Reply