डोंगराच्या कुशीत जन्म घेणारी नदी कुठल्याश्या अनावर ओढिने सागराच्या दिशेने धावत सुटते..दगड-धोंडे, काट्या-कुट्यातून वाट काढत ती सागराकडे झेपावते..डोंगर माहेर तर सागर सासर..सासरी निघालेल्या नदीला माहेराची सय सतत येतं असते आणि एखद्या वळणावर न राहावून नकळत ती माहेराच्या दिशेने वळण घेतै..माहेरी जाण्यासाठी नदी ज्या ठिकाणी वळते ते ठिकाण ‘तिर्थक्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध होतं..माहेराचं हे महत्व..!
नदी असो की कोणतीही सर्वसामान्य स्त्री, भावना सारख्याच असतात.। लेकीला माहेर मिळावं म्हणून सासरी जाणारी स्त्री ज्या ठिकाणी दोन क्षण थबकून आपल्या माहेराच्या दिशेने डबडबलेल्या डोळ्यांनी वळून पाहाते, त्या ठिकाणाला आपोआप पवित्र्य प्राप्त होतं..!!
-नितीन साळुंखे
Leave a Reply