माती
*अष्टाक्षरी ओवी*
शिर्षक
*मृदा*
मृदा तुझी रुपे भिन्न
चिकण,तांबडी,छान
पिके खुप तिथे अन्न
माती द्यावा मान पान ।।१।।
राबती तुझी लेकरे
अहोरात्र सेवा करी
खत पाणी ही देत रे
सोनं येई घरो घरी ।।२।।
मातीचा टिळा लाविती
बळी राजा तुझे भुषण
नाही उतत,मातत
तुच त्याचे आभुषण ।।३।।
हा सुगीच्या दिवसात
आनंद पर्वणी खास
चीज होता कष्टाचेच
विसरे साऱ्या कष्टास ।।४।।
कण न् कण मातीचा
परिस दगड पाहे
रुजता धान्याचा कण
कुस उजवली आहे ।।५।।
गुण गावे तरी किती
तुझी महान ही किर्ती
मनी नसे भय मुळी
स्वप्नांची होईल पुर्ती ।।६।।
— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply