माती न विसरावी कधी
मति न वाहावी
कोणा जगाच्या पाठीवर
मायबोली न विसरावी
तप, ध्यान करावे बहोंत
झगडण्यासाठी नव्हे
जगात कोठे जाऊ राहू
मराठीचे दान हवे
अर्थ–
Happy Marathi bhasha day bro….. उच्चशिक्षित मुलगी, हुशार मुलगा, कॉर्पोरेट जगात कामाचा बोलबाला पण गाव आपलं महाराष्ट्र या महान राष्ट्राच्या एखाद्या गावात आहे हे मात्र तो विसरून जातो. दिवसाची सुरुवात गुड मॉर्निंग पासून, ब्रेकफास्ट, लंच, brunch, high टी, डिनर पर्यन्त पोचतो पण न्याहारी हा शब्द आईच्या तोंडात आला तर तोच ब्रेकफास्ट विषारी वाटू लागतो. शाळेत प्रवेश घेताना माझ्या घरात आजी आजोबा आहेत सांगताना लाज वाटते पण i have ग्रँड मदर अँड father in our होम. हे सांगितलं की प्रवेश मिळायचे चान्सेस हे जास्त असतात आजकाल.
माणसाने शिकलच पाहिजे, त्यात मागे नाहीच पडलं पाहिजे पण जगाच्या बरोबर चालताना आपल्या संस्कृतीला, आपल्या भाषेला जगात कसं ताठ मानेने उभं करता येईल हे पाहायला हवं, केवळ पैशाच्या लाभासाठी आपली भाषा आणि संस्कृती सोडली तर उपयोग काय?
केवळ इंग्रजी शाळेत मुलांना घालून मुलं हुशार आणि यशस्वी होणार नाहीत. मुलांना परदेशी पाठवायचं आणि नंतर वृद्धापकाळी तोच मुलगा महिन्यातून एक फोनही करत नाही ही तक्रार करायची? मग इतक्या शिक्षणाचा आणि पैशाचा अट्टाहास करून मिळवले ते काय? डोळ्यांमध्ये केवळ अश्रू? त्यापेक्षा 2 रुपये कमी मिळाले तरी चालतील पण आपला बाप किंवा आई आपल्या बरोबरच हवा असं जेव्हा मुलांना वाटेल तेव्हा खरं तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं शिकवलं अस म्हणायला हरकत नाही. शाळा कोणतीही असो मायबोली टीकणं महत्वाचं आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply