नवीन लेखन...

‘मेक इन इंडिया’ आणि भारतीय सेनादलाचे आधुनिकीकरण

Made in India and the Modernization of Indian Armed Forces

१४ एप्रिलला मणिपूरच्या तामेंगलोंग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 21 पॅराचे मेजर अमित देसवाल शहीद झाले आहेत. झेलियांगग्राँग युनायटेड फ्रंटच्या (झेडयूएफ) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजर अमित देसवाल यांना वीरमरण आलं. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मादेखील करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंडवारामध्ये १८ एप्रिलला सुरु असलेल्या चकमकीत सैन्याने दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले.

श्रीनगर येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पाच दिवसांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध आज मागे घेण्यात आले. त्याचवेळी कुपवाडा येथे जमावबंदी आदेश आजही कायम ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सुरक्षा दलाच्या कारवाईत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश हंडवाडा शहरात कायम ठेवले आहेत.सुरक्षेची आव्हाने वाढत आहेत.सैनिकांची शस्त्रे कमीत कमी अतिरेक्यांच्या तुलनेत तरी आधुनिक असली पाहिजेत.

पठाणकोटला हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर “जैशे महम्मद‘ व त्याचा म्होरक्‍या मौलाना मसूद अझर याचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत करावा, यासाठी भारताने प्रयत्न करणे अपेक्षितच होते. दुर्दैवाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत यासंबंधीचा ठराव चीनने अडविला. पाकिस्तानची पाठराखण करण्याच्या आजवरच्या चिनी धोरणाचीच ही ताजी आवृत्ती आहे.

गोव्यातील बेतूल पठारावरील नाकेरी-किटला येथे २८ ते ३१ मार्च दरम्यान डिफेन्स एक्स्पो २०१६चे आयोजन करण्यात आले होते. एकाच छताखाली शस्रास्रांसंबंधातील सर्व माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून डिफेन्स एक्स्पोकडे पाहणे आवश्यक आहे. जगातील सार्वभौम राष्ट्रांना भूदल, नौदल आणि अंतर्गत सुरक्षा यंत्रणेबद्दल माहिती व तंत्रज्ञान देवाणघेवाणीसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागचा हेतू. यंदाच्या प्रदर्शनामध्ये ४७ देशांच्या १०००हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. हा आकडा विक्रमी ठरला आहे. या एक्स्पोमधून भारतीय सैन्यदलांना विविध प्रकारच्या साधनसामग्रीचा पुरवठा करण्यासंबंधीचे अनेक करार करण्यात आले. तसेच आधीच्या प्रकल्पांनाही गती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न यावेळी झाले आहेत. मेक इन इंडिया आणि आधुनिकीकरणाला चालना देण्याच्या दृष्टीने हे एक्स्पो महत्त्वपूर्ण ठरले.

मेक इन इंडिया या प्रकल्पांतर्गत उत्पादनक्षेत्राला चालना

देशाच्या संरक्षणासाठी सैन्यसामथ्र्य आणि युद्धसज्जता अत्यंत महत्त्वाची असते. युद्धसज्जतेमध्ये मनुष्यबळाबरोबरच अत्याधुनिक शस्रास्रे आणि साधनसामग्री यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. भारत हा शस्रास्रे आणि साधनसामग्रीचा एक मोठा आयातदार देश आहे. या आयातीवर हजारो कोटी रुपये आपण खर्च करत असतो. त्यातून देशाची आर्थिक तूटही वाढत असते. हे लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने मेक इन इंडिया या प्रकल्पांतर्गत संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढवली आणि देशांतर्गत शस्रास्रे व साधनसामग्रीच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या धोरणानुसार शस्रास्रे आणि साधनसाम्रगीच्या देशांतर्गत उत्पादनावर भर देण्यात येणार आहे. यातून देशातील उत्पादनक्षेत्राला आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा सरकारचा मनोदय आहे. याचाच एक भाग म्हणून गोव्यातील बेतूलच्या पठारावर भरलेल्या डिफेन्स एक्स्पोकडे पहावे लागेल.

४७ देशांच्या १००० हून अधिक कंपन्यांनी सहभाग

जागतिक पातळीवर २००० पासून या संरक्षण प्रदर्शनाला सुरवात झाली. युद्धात वापरण्यात येणारी यंत्र व शस्त्रसामग्री या प्रदर्शनात मांडली जाते. विविध देशांतील ही सामग्री बनविणारे उद्योजक प्रदर्शनात सहभागी होत असतात. युद्धासाठी नवनवीन यंत्र व शस्त्रसामग्री देशांना मिळावी व उत्पादकांचा व्यवसाय वाढावा हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट असते. या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. या प्रदर्शनामध्ये ४७ देशांच्या १०००हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. हा आकडा विक्रमी ठरला आहे. यामध्ये अमेरिका, इस्राईल, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटेन, हाँगकाँग, हंगेरी, क्रोएशिया, सायप्रस, झेक रिपब्लिक, इजिप्त, हंगेरी, मलेशिया, नेदरलँड, न्यूझिलंड, नायजेरिया, पोर्तुगाल, रोमानिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, तैवान, स्पेन इटली आणि जपान आदी देशांचा समावेश होता.

मागील डिफेन्स एक्स्पो नवी दिल्लीमध्ये भरवण्यात आले होते. त्या प्रदर्शनामध्ये ३० देशांमधील संरक्षण साधनसामग्री निर्माण करणाèया सुमारे ६०० कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळच्या प्रदर्शनामध्ये परदेशी शिष्टमंडळांची संख्याही ५११ वरून ९५० वर पोहोचल्याचे दिसून आले.

या प्रदर्शनामधून भारतीय शस्रास्रांचे प्रदर्शन जगाला झाले आहे. यामध्ये हेवी मोबिलिटी ६बाय६ व्हेईकल, सारंग हेलिकॉप्टर्स, टाटा मोटर्सने बनवलेले आर्मड् फायटीग व्हेईकल, अर्जुन टँक आणि भारतीय बनावटीचे तेजस हे युद्धविमान हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण राहिले. याखेरीज कमीत कमी मनुष्य आणि वित्तहानी करून शत्रूचा ठाव घेणारी मानवरहित संयंत्रेही या प्रदर्शनात दिसून आली.

डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजन २०१६ ही जाहीर

एकाच छताखाली शस्रास्रांसंबंधातील सर्व माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून डिफेन्स एक्स्पोकडे पाहणे आवश्यक आहे. डिफेन्स एक्स्पोदरम्यान डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजन २०१६ही जाहीर करण्यात आली आहे. या डीपीपी२०१६चा फायदा मेक इन इंडियाच्या विकासाला होणार आहे. यानिमित्ताने आपण गेल्या काही महिन्यांमध्ये संरक्षणसज्जतेसाठी झालेले प्रयत्न पाहणे आवश्यक ठरेल. यामध्ये आपण रणगाड्यांचा मुद्दा घेतल्यास, सैन्यामध्ये अर्जुन, टी९०, टी-७२ हे महत्त्वाचे रणगाडे आहेत. टी-९० हे आधुनिक रणगाडे मानले जातात. आतापर्यंत ७८० टी-९० रणगाडे भूदलामध्ये सामील झाले आहेत. आणखी ९००हून अधिक रणगाड्यांची आपली गरज आहे. मेक इन इंडियाच्या अंतर्गत २३६ टी-९० रणगाडे विकत घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे रणगाडे तामिळनाडूमधील आवडी कारखान्यामध्ये बनवण्यात येणार आहेत.

याखेरीज संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी १२४ अर्जुन मार्क-२ हे आधुनिक रणगाडे बनवण्यासाठी डीआरडीओला प्रोत्साहित केले आहे. अर्जुन मार्क-१ पेक्षा या रणगाड्यांची फायरिंग करण्याची क्षमता, हालचालींची गती आणि शत्रूंच्या क्षेपणास्रांपासून मिळणारी क्षमता अधिक आहे. मेकॅनाईज्ड् इन्फंट्रीमध्ये बीएमपी २ हे वाहन वापरले जाते. सारथ नावाचे हे वाहन आंध्र प्रदेशातील मेडक कारखान्यात बनवण्यात येते. मेकॅनाईज्ड इन्फंट्रीकरिता फ्युचर इन्फंट्री कॉम्बेट व्हेईकल हा सर्वांत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. मेक इन इंडियाअंतर्गत या कार्यक्रमासाठी २६०० हून अधिक वाहने तयार करण्यात येणार आहेत. यासाठी खासगी क्षेत्रातील मqहद्रा डिफेन्स-बीएई ब्रिटेन, लार्सन टुब्रो-सॅमसंग इंजिनिअरिंग, टाटा मोटर्स- भारत फोर्ज या कंपन्या स्पर्धेमध्ये आहेत. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊन हे काम सुरू होणे अपेक्षित आहे. २०२०-२१ पर्यंत नव्याने बनवलेल्या वाहनांच्या चाचण्या सुरू केल्या जाणार आहेत. तिन्ही दलांच्या आधुनिकीकरणाबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांना गती मिळणे आवश्यक आहे.

सैन्यदलांना विविध साधनसामग्रीचा पुरवठा करण्यासंबंधीचे अनेक करार

या एक्स्पोमधून भारतीय सैन्यदलांना विविध प्रकारच्या साधनसामग्रीचा पुरवठा करण्यासंबंधीचे अनेक करार करण्यात आले. तसेच आधीच्या प्रकल्पांनाही गती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न यावेळी झाले आहेत. भारत आणि फ्रान्स संयुक्तपणे भारतीय नौदलासाठी विकसित करत असलेल्या लघु पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाèया क्षेपणास्त्राच्या नमुन्यांचे यावेळी प्रथमच सादरीकरण करण्यात आले. स्वीडनच्या साब कंपनीने ‘डिफेन्स एक्स्पोच्या वेळी भारतीय बाजारपेठेत उतरण्याची तयारी करत असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच साब कंपनीने आपल्या शस्त्रास्त्रांच्या तंत्रज्ञानाचे भारताला हस्तांतर करण्याचीही तयारी दर्शविली आहे.

अमेरिकेकडून भारतीय हवाई दलासाठी खरेदी करण्यात येणाèया चिनूक हेलिकॉप्टरसाठी हवाई संचालन यंत्रणा पुरविण्याचे कंत्राट या वेळी रॉकवेल कॉलिन्स या कंपनीला मिळाले आहे. या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाच्या रसद पुरवठा क्षमतेत बरीच वाढ होणार आहे. या प्रदर्शनामध्ये ‘रिलायन्स डिफेन्सङ्कने इस्रायलच्या राफाएल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम लिमिटेडशी संयुक्त कंपनी स्थापन करण्याचा करार केला असून इंदूरमधील धिरुभाई अंबानी लँड सिस्टिम पार्क तेथे हवेतून हवेतील लक्ष्यावर मारा करणारी क्षेपणास्त्रे, हवाई सुरक्षा यंत्रणा इत्यादी शस्त्रास्त्रांच्या संशोधन, विकास निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच महिंद्रा, अशोक लेलँड आणि टाटा मोटर्स कंपन्यांना भूदलासाठी वाहने पुरविण्याची कंत्राटे या प्रदर्शनात मिळाली आहेत. भारतीय नौदलासाठी एस-७० बी हेलिकॉप्टरच्या खरेदीसंबंधीची अमेरिकेच्या सिकोस्र्की कंपनीशी पुढील बोलणी सुरू झाली आहेत. त्याचबरोबर भारतीय नौदलातील ‘वर्षाव्यान्काङ श्रेणीतील पाणबुड्यांचे आधुनिकीकरण करण्याबाबत रशियाबरोबर बोलणी सुरू झाली आहेत. भारतीय नौदलासाठी ‘पी-७५ आय अंतर्गत देशातच अत्याधुनिक पाणबुड्या बांधण्याची योजना आहे.

संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया कार्यक्रमाला चालना दिली जात आहे. आज भारतातील खासगी क्षेत्राकडेही गुणवत्तापूर्ण संरक्षण सामग्रीचे उत्पादन करण्याची निश्चितच क्षमता आहे. या एकूण पाश्र्वभूमीवर आता देशापुढील सद्य स्थितीतील धोक्यांचा आढावा घेऊन देशाचे रक्षण करण्यासाठी सर्वसमावेशक सुरक्षा धोरण आखणे, आधुनिकीकरणाला गतीने चालना देणे आणि त्यासाठी संरक्षणक्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

1 Comment on ‘मेक इन इंडिया’ आणि भारतीय सेनादलाचे आधुनिकीकरण

  1. आपले लेख अतिशय अभ्यासपूर्ण असतात. बरीच नवीन माहिती मिळते. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..