माई आपल्या शेजारीच वॉकर ठेवून खुर्चीवर बसून टिव्ही बघत होत्या. नाना तावातावाने आले आणि म्हणाले उठा इथे आरामात बसून टिव्ही बघत बसलात. अगोदर तुमच्या नोकरी मुळे हाताने वाढून घ्या. टेबल आवरा. आणि आता सून बाई. मुलगा नातवंड जेवायला बाहेर गेले आहेत मला भात करायला सांगितले आहे. चला सांगा आता पाणी किती घालायचे ते. माझं नशीब असे म्हणत अगस्ताळी स्वभाव कपाळावर मारुन घेऊन आत मधून कुकर मध्ये पाणी घालून दाखवले. आणि नुसता भात करून संपले का तुम्हाला वाढा काढा. हो आता तुम्ही म्हणाल की माझ्या वर कशाला डाफरता सून बाईंना सांगा की. अगदी बरोबर आहे मी बोलत नाही म्हणून तर. आता हेच दिवस आहेत ना त्यांचे खाणे हिंडणे फिरणे. आमच्या मुळे किती दिवस घरात बसून रहायचे. पण कुणालाच काही बोलू शकत नाही म्हणून मधल्या मधे..
घरुन काम दोघे दोन खोल्यात काम करतात. नातवंडाना करमत नाही म्हणून त्यांचे खेळ बैठकीत. आणि लहानच आहेत दंगामस्ती. ओरडणे. भांडणं वगैरे करणारच. याच वेळी नाना टिव्ही बघत असतात. मग व्यत्यय आला की ओरडतात. मुलेही कधी कधी वाद घालतात. हे ऐकून मुलगा बाहेर येऊन कारण विचारतो. आणि नाना अहो आता आम्ही काम करावे की नाही. त्यांना शाळा नाही. मोबाईल नाही. टिव्ही नाही मग काय करायचे त्यांनी. तुम्हीच टिव्ही बंद करून मोबाईल वर बघत जा हेडफोन लावून. आणि आत गेला तसे नाना खूप चिडले. बघा आता एवढेच राहिले होते. आम्हीच माघार घेतली पाहिजे बरोबर आहे घर त्यांच राज्यही त्यांचेच आम्ही आश्रीत तेंव्हा बोलायचे नाही गप्प गुमान बंद करा आणि बसा शांत. आता नानांची पण काही चूक नाही. आर्थिक परिस्थिती मुळे सिनेमा नाटक सहली काहीही जमले नाही व्यवसाय. कामाचा व्याप मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसा व वेळ गेला. आत्ता कुठे सगळे स्थिरस्थावर झाले आहे. निवांतपणा मिळाला आहे. मनासारखे जगायचे ठरवले होते आणि तसेच चालू होते. अचानक ही महामारी आली. सगळेच घरी कुणालाही काहीही सांगू शकत नाही म्हणून मधल्या मधे..
मावशी बाई दिवस भर काम करायला येतात. घरचे इथल्या कामांनी दमतात. आणि काही तरी कारण घडते तो आलेला राग माईवर निघतो. बसल्या जागी आणून देणे. चहा पाणी. शिवाय अनेक गोष्टी कराव्या लागतात. आणि आता माईचे दुखणे बारामहिने. त्यामुळे त्यांना गप्प बसावे लागते. सुनबाईना अगोदरच खूप काम असते म्हणून मावशीबाई बद्दल काही सांगता येत नाही. आणि समजा सांगितले तर दोघींची कुरबूर झाली व त्यांनी काम सोडले तर माईवरच खापर फुटणार म्हणून अपमानास्पद वागणूक दिली तरी सहन करावा लागतो कारण मधल्या मधे घुसमट होते. नाईलाज आहे म्हणून.. अशा कितीतरी गोष्टी आहेत मधल्या मधेच होत आहेत.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply