नवीन लेखन...

मराठी लेखक, समीक्षक, प्राचार्य मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर

म.द. हातकणंगलेकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे झाला. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हातकणंगलेत झाले. वडिलांच्या अकाली निधनामुळे ते मामाकडे सांगलीत आले आणि सांगलीकर होऊन गेले. १९४४ मध्ये ते मॅट्रिक झाले आणि १९४६ साली त्यांनी विलिंग्डन कॉलेजात असताना इंटर आर्ट्‌सच्या परीक्षेत तर्कशास्त्र या विषयासाठी ठेवलेले प्रसिद्ध असे सेल्बी पारितोषिक मिळविले. नंतर, १९४८ मध्ये बी.ए परीक्षेत इंग्रजी विषयासाठी त्यांना मुंबई विद्यापीठात एलिस पारितोषिक मिळाले. १९५० मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी आणि मराठी विषयात एम.ए. पूर्ण केले. त्यानंतर हातकणंगलेकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगलीमधील विलिंग्डन महाविद्यालयात अर्धव्याख्याता म्हणून अध्यापन कारकिर्दीला सुरवात केली. पुढे धारवाड येथे महाविद्यालयात ते पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले. १९५६ साली ते विलिंग्डन मध्ये परतले आणि तिथेच ते प्राध्यापकापासून ते प्राचार्य असे सलग १९८७ सालापर्यंत काम करीत राहिले. हातकणंगलेकर हे वास्तविक इंग्रजीचे प्राध्यापक, पण त्यांचा मराठी साहित्याचा व्यासंग खूप दांडगा होता. त्यातूनच त्यांनी ललित लेखनाला प्रारंभ केला आणि पुढे जाऊन ते समीक्षात्मक लेखन करू लागले. तत्कालीन सत्यकथा, समाजप्रबोधन पत्रिका, नवभारत, वसंत, वीणा, महाव्दार अशा नियतकालिकांतून त्यांचे लेखन चांगलेच गाजू लागले. याच काळात मराठीचे नामवंत कथालेखक जी.ए. कुलकर्णी ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. ’जीएं’शी झालेला त्यांचा पत्रव्यवहार पुढे हातकणंगलेकरांनी खंडरूपान्रे प्रसिद्ध केला. पुढे त्यांनी अनेक इंग्रजी कथांचे मराठीत लेखन केले, तर गो.नी.दांडेकर यांची माचीवरचा बुधा आणि व्यंकटेश माडगूळकर यांची सती या कांदबर्यांीचे इंग्रजीत अनुवाद केले.
आपल्याला आलेल्या अनेक अनुभवावरून ’उघडझाप हे आत्मवृत्त वाचकांच्यासमोर आणले.. त्याचे प्रकाशन त्यांचे साहित्यिक मित्र आणि प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झाले होते.
त्यांनी समीक्षा केलेल्या अनेक कांदबर्यास आणि साहित्याबाबत त्यांनी आपली मते ठामपणे मांडलेली असायची त्यामुळे त्याविरोधात कोणीसुद्धा ब्र काढू नये इतके ते मत ठाम आणि परिपूर्ण असायचे. त्यामुळेच त्यांच्या स्मीक्षेला मराठी साहित्यात चांगलेच वलय प्राप्त झालेले असे.
म,द, हातकणंगलेकरांनी साहित्य संस्कृती मंडळ तसेच विश्वकोश मंडळावरही अनेक वर्ष काम केले होते. त्यांनी अनेक नवसाहित्यिकांना प्रेरणा देण्याचे आणि त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देण्याचा जो प्रयत्ना केला त्यातून अनेक नवे साहित्यिक तयार झाले. त्यांनी आजचे मराठीतील आघाडीचे लेखक विश्वास पाटील, राजन गवस, दादासाहेब मोरे यांच्यापासून सांगली परिसरातील नामदेव माळी, दिलीप शिंदे, दयासागर बन्ने, चैतन्य माने अशा अनेक नवोदित लेखकांना लिहिते केले, त्यांना प्रकाशक शोधून दिले.मराठीतील अक्षरवाङ्‌मय इंग्रजीत अनुवादित करून त्यांनी मराठीचे स्थान देश आणि जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले. महाराष्ट्राबाहेरच्या भारताला आणि जागतिक साहित्य विश्वााला मराठीतील कसदार लेखन पोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची ठरली. सांगली येथील ८१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ते अध्यपदाच्या निवडणुकीत विक्रमी मताने निवडले गेले होते. म.द. हातकणंगलेकर २५ जानेवारी, २०१५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..