कर्नाटकामध्ये मधुकेश्वर मधील बनवासी येथे गेलो असताना वेगळाच अनुभव आला. ज्याप्रमाणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे तशी कर्नाटकाची सांस्कृतिक राजधानी समजली जाते, दक्षिण काशी असेही तिला म्हणतात. मधुकेश्वर देवळात अनेक देवाच्या मूर्ती आहेत अगदी यमापासून ते शंकरापर्यंत , शंकराच्या विविध मूर्ती आहेत आणि विविध प्रकारची शिवलिंगे ही आहेत . ते देऊळ १२०० वर्षे जुने आहे. हरिहर आणि बुक्क जेव्हा मोहिमेसाठी जात तेव्हा येताना अनेक भागातून मूर्ती घेऊन येत असत. अशा अनेक मूर्ती आहेत. तेथील इतिहास अभ्यासक श्री. रोहन थत्ते सांगत होते.
तितक्यात ते सांगता सांगता म्हणाले, “इथे गणपतीची अर्धी मूर्ती आहे आणि तिची नेहमीप्रमाणे पूजाही केली जाते.” ते म्हणाले खरे तर भंगलेल्या मूर्तीची कधीही पूजा केली जात नाही . पण ही जी मूर्ती आहे ती अर्धीच आहे, तरी पण पूर्ण दिसते, नीट बघितल्यावर ती अर्धी आहे ते जाणवते. मूर्ती पूर्ण काळ्या दगडात असून पटकन ते लक्षात येत नाही की ही मूर्ती अर्धी आहे आणि तिचा अर्धा भाग वाराणसी येथे आहे.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply