चंद्रमाच तो पौर्णिमेचा
आभाळ ते चांदण्यांचे
झोंबता शीत धुंद वारा
हितगुज ते मनामनांचे…
आसमंत गंधाळलेला
नाचती मयुर भावनांचे
गुंतती अधर पाकळ्या
मधुस्पर्श, प्रीतभावनांचे…
श्वासातुनी श्वास गुंतता
नि:शब्दी गुंतणे प्रीतीचे
सारेच, तृप्तीचे हिंदोळे
शुभ्रचांदणे आत्मसुखाचे…
शांतले तन मन निरागस
पाझर निष्पाप लोचनांचे
मुक्त मोकळे, रिक्त सारे
हे बंध, या रम्य जीवनाचे…
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २३०
१०/९/२०२२
Leave a Reply