नवीन लेखन...

मद्रास दिवस

मंडळी आपल्याला पाश्चात्य संस्कृतीचे दिवस बरोबर माहित असतात , पण आपल्या संस्कृतीतले बरेच दिवस आपल्याला ठाऊक नसतात. त्यातलाच एक दिवस आज भारतामध्ये एकदम जोशात साजरा केला जातो. या दिवसाचं नाव आहे ‘ Madras Day . ’ आता तुम्ही विचार कराल की मद्रास म्हणजे नक्की कुठलं राज्य आणि शहर ? तर मद्रास म्हणजे तामिळनाडू राज्य व सध्याचं खूपच चकचकीत चेन्नई शहर. ह्या आगळ्यावेगळ्या दिवसाबद्दल आपण थोडं जाणून घेऊ की नक्की काय होतं या दिवशी आणि ह्या दिवसाचा नक्की काय इतिहास आहे.

मद्रास डे हा सण , तामिळनाडूतील मद्रास (आताचे चेन्नई) स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा सण आहे. दरवर्षी हा सण २२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. २२ ऑगस्ट १६३९ ही तारीख मद्रासपट्टणम किंवा चेन्नापट्टणम ह्या गावाच्या खरेदीसाठी अधिकृतपणे घोषित करण्यात आली. हे गाव  ईस्ट इंडिया कंपनीचे घटक असलेल्या अँड्र्यू कोगन व फ्रान्सिस डे यांनी त्यावेळचे विजयनगरचे व्हाइसरॉय दमर्ला वेंकटाद्री नायक यांच्याकडून खरेदी केले.

२००४ साली चेन्नईतील पत्रकार व्हिन्सेंट डिसोझा यांनी इतिहासकार एस. मूथय्या ह्यांना मद्रास डे ची संकल्पना सुचवली. त्यानंतर हा दिवस साजरा केला जाऊ लागला. प्रदर्शनं, व्याख्यानं, चित्रपटांचं स्क्रिनिंग, कोडी ह्या मनोरंजनात्मक गोष्टी हा दिवस साजरा करण्यासाठी केल्या जातात. पुढे हळूहळू या दिवसाची व्याप्ती वाढत गेली आणि कीर्ती दूरवर पसरली. २०१४ व २०१५ चा सोहळा सप्टेंबर महिन्यापर्यंत चालला म्हणून ह्या सोहळ्याचं नाव मद्रास आठवडा वरून मद्रास महिना ठेवण्यात आलं.

सरतेशेवटी मंडळी एकच गोष्ट म्हणजे , आपल्या भारतीय संस्कृती जास्तकाळ टिकण्यासाठी आणि आपला इतिहास पुढच्या पिढ्यांना समजण्यासाठी असे सोहळे साजरे होणं हे फारच आवश्यक आहे.

सगळ्यांना मद्रास दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

– आदित्य दि. संभूस

#Madras Day #22 August

 

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..