२४ फेब्रुवारी
आजच्याच दिवशी १९६१ मध्ये मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्यात आले आहे.मद्रास हे नाव इंग्राजामुळे भारतात रुजले होते.भारतात पाय रोवल्यानंतर १६३९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने जमीन खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास पोर्ट आणि फोर्ट सेंट जॉर्ज, सेंट मेरीज चर्च तयार केले. मदर मेरी मुळे इंग्रज त्या ठिकाणाला मद्रास म्हणत होते. मद्रास राज्याचे नामकरण होण्यासाठी पेरियार रामास्वामी यांची चळवळ कारणीभूत ठरली. पेरियार यांनी १९२५ मध्ये स्वतःची ओळख आणि स्वाभिमान जागविण्यासाठी चळवळ सुरु केली. त्यांनी पहिल्यांदा द्राविड लोकांचे हक्काचे घर म्हणून द्राविड नाडू (नाडू म्हणजे राष्ट्र) हा शब्द पुढे केला. पेरियार यांनी द्राविडार कझागम (Dk – Dravidar Kazhagam) नावाचा पक्ष काढून तामिळ, मल्याळम, तेलगू आणि कन्नड भाषिक लोकांच्या अस्मिता जागविण्याचा प्रयत्न केला. पेरियार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच सामाजिक क्रांतीच्या कामासाठी ओळखले जातात. वंचित समाज, महिला यांना हक्कांची जाणीव करुन देत असतानाच त्यांनी हिंदी भाषेला विरोध आणि तामिळ संस्कृतीच्या संवर्धनाचा मुद्दा पुढे नेला.अण्णादुराई हे तामिळनाडू राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply