कांदा नी भाकर
किती महागली
पोट कसे भरू
गळचेपी झाली
मेथीची जुडाई
पन्नाशीला आली
कोथिंबीर लुप्त
मी घिरट्या घाली
काही भाज्या तर
झाल्या महाराणी
गातात नेहमी
श्रीमंतीची गाणी
राब राबतो रे
शेतकरी शेता
दलाल पदरी
माप काहो घेता
ज्याचा आहे नफा
त्याला द्यानं जरा
फुले सुखी वाफा
दारी तर तरा
महागाई थांब
नको शोषू रक्त
विनवणी माझी
एवढीच फक्त
— सौ. माणिक (रुबी)
Leave a Reply