“ श्वेते वृषे समारुढा श्वेताम्बरधरा शुचिः । महागौरी शुभं दद्धन्महादेवप्रमोददा ।। ”
अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासुन सुरु होणार्या नवरात्रात मा दुर्गेच्या नऊ रुपांची उपासना केली जाते, त्या नवशक्तींच्या रुपांपैकी आठवे स्वरुप म्हणजे महागौरी होय.
देवीचे हे स्वरुप कुमारिकेप्रमाणे अल्लड, चंचल, नाचणारे, बागडणारे आहे. योगाग्निना तु या दग्धा पुनर्जाता हिमालयात । कुन्देन्दुशुभ्रवर्णा च महागौरीत्यतः स्मृता ।। वरिल देवी पुराणातील आख्यायिकेनुसार, योगाग्नीने दुग्ध झालेली, जी हिमालयापासुन निर्माण झाली ती कुन्दपुष्प,शंख, चंद्रासारखी शुभ्रधवल झालेली. यामुळे महागौरी नावाने ओळखली जाते. वृषभ (बैल) वाहन असलेल्या महागौरीच्या उजव्या हातात त्रिशुल व अभयमुद्रा तसेच डाव्या हातात डमरु व वरमुद्रा आहे. चेहरा शांत असलेल्या महागौरीच्या उपासनेने भक्तांचे सर्व किल्मिष दुर होतात, तसेच पुर्व संचीताचे पाप नष्ट होते. पुढे पाप-संताप, दुख-दैन्य येत नाही. भक्त अक्षय पुण्याचा अधिकारी होतो, अलौकिक सिद्धी प्राप्त होतात. महागौरीच्या आराधनेने सोमचक्र जागृत होते. अबिंका देवी पार्वतीच्या शरिरकोषातुन प्रकट झाली अशीही आख्यायिका आहे, हिच अंबिकादेवी कौशिकी नावानेही प्रसिद्ध आहे.
महागौरी स्तोत्रपाठ
सर्वसंकट हंत्री त्वंहि धन ऐश्वर्य प्रदायनीम्।
ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाभ्यहम्॥
सुख शान्तिदात्री धन धान्य प्रदीयनीम्।
डमरूवाद्य प्रिया अद्या महागौरी प्रणमाभ्यहम्॥
त्रैलोक्यमंगल त्वंहि तापत्रय हारिणीम्।
वददं चैतन्यमयी महागौरी प्रणमाम्यहम्॥
Leave a Reply