रत्नागिरी केळशी गावात हे स्थान असून, हे ठिकाण तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेले आहे; मंदिर अगदी लहान असलं तरीपण ते अनेक शतकांपूर्वीचं आहे; भक्तांच्या रक्षणासाठी कोल्हापूरच्या महालक्ष्मीने धाव घेतल्याची अख्यायिका असल्याचं ग्रामस्थांचं मानणं आहे; चैत्र महिन्यात येथे मोठा उत्सव भरतो व चैत्र पौर्णिमेला सकाळपासून संध्याकाळ पर्यंत रथ प्रत्येक घरात फिरवून या उत्सवाची सांगता केली जाते. उत्सव समाप्तीच्या समयी प्रत्येकाला मानाचा नारळ देण्याची परंपरा आहे, या सुमारास अडीच हजार भक्तांना प्रसाद म्हणून भोजन देण्यात येते.
— सागर मालाडकर
Leave a Reply