नवीन लेखन...

महालक्ष्मी पूजन

अश्विन शुक्ल अष्टमीचे हे व्रत केले जाते. या ग्रंथासाठी निशिथ काल अष्टमी घेतली जाते.(निशिथ काल हा मध्यरात्रीच्या दरम्यान असतो.) या दिवशी सकाळी महालक्ष्मीचे पूजन करतात. यात महालक्ष्मी शेजारी सोळा दोरे एकत्र करून 16 गाठी मारून ठेवतात. सप्तशती मध्ये महालक्ष्मीचे ध्यान असे सांगितले आहे मणिमाला, परशु, गदा, बाण, व्रज, धनुष्य, कमंडलू, कालदंड, शक्ती, खड्ग, चर्म, शंख, घंटा, मदिरापात्र, शूल, पाश आणि सुदर्शन अशी १८ आयुधे धारण करणाऱ्या,पोवळ्याप्रमाणे कांती असलेल्या, कमलासना महिषासूरमर्दिनीचे, महालक्ष्मीचे ध्यान करतो. पूजेनंतर वर उल्लेख केलेल्या दोरकाची पूजा करून डाव्या मनगटावर बांधतात. नंतर हातात सोळा दुर्वा व सोळा अक्षता घेऊन कहाणी ऐकतात. हे व्रत ओळीने पाच वर्षे करतात.

चित्तपावन ब्राह्मण वर्गात हे व्रत विवाहानंतर सलग पाच वर्षे करतात. त्याचा विधी थोडा भिन्न आहे. सकाळी देवीची पूजा करतात. त्यापूर्वी तुळशीची पूजा करून तेथील विवाहास जेवढी वर्षे झाली असतील तेवढे खडे आणून देवीजवळ ठेवतात. १६ पेरांची दुर्वा किंवा सोहळा धाग्यांचा रेशमी दोरा घेऊन विवाहास जेवढी वर्षे झाली असतील तेवढ्या गाठी मारतात. पूजासमाप्तीनंतर हा दोरा डाव्या हातात बांधतात. प्रदोषकाळी तांदुळाच्या उकडीचा महालक्ष्मीचा मुखवटा तयार करतात. पूजा आरती झाल्यावर घागरी फुंकणे कार्यक्रम सुरू होतो. रात्रभर जागरण करतात. सूर्यादय अष्टमीला महाष्टमी म्हणतात व त्या दिवशी महाष्टमीचा उपवास करतात.

नवमीचे दिवशी नवरात्रोत्थापन होते. काहींचा समज आहे की नवरात्रोत्थापन व दसरा एकच आहे. क्वचित प्रसंगी हे दोन्ही एकाच दिवशी येतात पण दसरा दशमीला असतो तर नवरात्रोत्थापन नवमीला असते.

— विद्याधर करंदीकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

No posts found.
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..