भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष, महालय पक्ष असे म्हणतात. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महालय केला जातो. हा पक्ष पितृकार्याला अत्यंत योग्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे. खरे पाहता रोज महालय करण्यास (पितृपक्षात) सांगितले आहे. परंतु ते शक्य नसल्यास आपला पिता ज्या तिथीला मृत झाला असेल त्या तिथीला महालय करावा.
या पक्षात ज्या दिवशी अपराण्ह काळी भरणी नक्षत्र असते त्या दिवशी भरणी श्राद्ध करतात. नवमीचे शी सौभाग्यवती मृत झाली असल्यास तिचे श्राद्ध करतात. म्हणून या नवमीला अविधवा नवमी असे नांव आहे. द्वादशी रोजी संन्यासी लोकांचा महालय करावा व चतुर्दशी रोजी शास्त्राने अपघातात मृत झालेल्यांचे महालय श्राद्ध करतात. अमावस्येला सर्व पितरांना उद्देशून महालय श्राद्ध करतात.
Leave a Reply