बडोद्याचे महाराज फतेहसिंग प्रतापराव गायकवाड यांचा जन्म २ एप्रिल १९३० रोजी बडोदा येथे झाला.
क्रिकेटर म्हणून फतेहसिंह गायकवाड १९४६ ते १९५८ या काळात बडोदा संघाकडून खेळले. यात त्यांनी पहिल्या सत्रात ९९ धावा केल्या. ९९ ही त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट स्कोअर होता. फतेहसिंग गायकवाड यांनी १९५९ मध्ये भारतीय संघाचे मॅनेजरपद भूषवले. त्यावेळी ते केवळ २९ वर्षाचे होते. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष बनले.
रणजी स्पर्धेत खेळणारे लोकसभेचे ते एकमेव खासदार होते. फतेहसिंग गायकवाड हे १९५७ ते १९६२, १९६२ ते १९६७, १९७१ ते १९७७ व १९७७ ते १९८० पर्यत कांग्रेस पक्षाचे बडोद्याचे सांसद होते. भारतातील टीव्हीवर समालोचन करण्याचा पहिला मानही त्यांना जातो.
१९८० मध्ये त्यांनी ‘द पेलेसिस ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिले होते. ते लंडन एमसीसी क्रिकेट क्लबचे मानद लाइफ टाईम मेंबरही होते.
फतेहसिंग गायकवाड यांचे निधन १ सप्टेंबर १९८८ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply