आज प्रसारमाध्यमांचा पूर आलाय.. सर्वात सशक्त माध्यम म्हणजे प्रसारमाध्यम. पूर्वी प्रसारमाध्यमं इतकी सशक्त नव्हती. त्यामुळे जगातल्या घडामोडी सहसा कळत नसत. पण आता एक टिचकी (क्लिक केले) मारली तरी माहितीचा खजाना तुमच्या डोळ्यासमोर पसरलेला असतो. या खजिन्यात आणखी एकाची भर पडली आहे. महाराष्ट्र २४ तास… www.maharashtra24taas.com महाराष्ट्र २४ तास हे एक वेबपोर्टल आणि ऍंड्रॉइड ऍप्स आहे. विश्वातील ताज्या घडामोडी आणि विश्वकल्याणकारी विचार लोकांच्या घराघरात पोहोचविण्यासाठी व जनमानसातील विचारांना सकारात्मक दृष्टिकोन देण्यासाठी “महाराष्ट्र २४ तास” सज्ज झाले आहे. यामध्ये महाराष्ट्र, भारत विश्वातील ताज्या घडामोडी व कला, क्रिडा, साहित्य, अध्यात्म, सांस्कृतीक लेख आणि त्याच बरोबर तरुण व बालगोपाळांसाठी आकर्षक सदर आहेत.
लोकमान्य टिळक म्हणाले होते की, रस्तोरस्ती रात्री दिवे लावलेले असल्याने आणि पोलिसांचा पहारा सतत फिरत राहिल्याने जो उपयोग होतो, तोच उपयोग ज्या ज्या जागी पत्रकाराची लेखणी चालू राहिल्याने होतो. हा लोकमान्यांचा वारसा पुढे सुरु ठेवण्यासाची महाराष्ट्र २४ तास तत्पर आहे. आनंदाची बाब अशी की तळागाळातल्या नवोदित लेखकांना, कवींना आणि पत्रकारांना ही सुवर्ण संधी आहे. कारण या सर्व नवोदितांना महाराष्ट्र २४ तास हक्काचं आणि मानाचं व्यासपीठ मिळवून देणार आहे. यासाठी कुठलाही मोबदला दिला जाणार नाही. परंतु त्यांचे विचार / साहित्य लोकांसमोर मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. वाचकही आपले विचार येथे मांडू शकतात. तर पाहता काय ? महाराष्ट्र २४ तासला आजच भेट द्या.. फक्त एक क्लिक : www.maharashtra24taas.com
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply