राष्ट्रनिमिर्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या तीन द्रष्ट्या व्यक्तींनी राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी १८६० मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
गेल्या १५७ वर्षात संस्थेच्या कार्याचा विस्तार शिशु शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत आणि कौशल्य प्रशिक्षणापासून आयुर्वेद महाविद्यालयापर्यंत झाला आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शाळा, महाविद्यालये व महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांत एकूण ७७ शाखा आहेत.
शाळेचे माजी विद्यार्थी संस्थेच्या बारामती येथील शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या शरद पवार, राज्यसभेचे खासदार साबळे, एअर मार्शल भूषण गोखले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मधुरा दातार सुगम, अमृता सुभाष, विवेक वेलणकर अशी कितीतरी नावे आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply