महाशय धर्मपाल गुलाटीजी यांचा जन्म २७ मार्च १९२७ रोजी सध्याच्या पाकिस्तानच्या सियालकोट मध्ये झाला.
महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. १९३३ मध्ये धर्मपाल गुलाटी यांनी ५वीत असतानाच शिक्षण सोडलं. १९३७ साली धर्मपाल गुलाटी यांनी वडिलांच्या मदतीनं काचेचा छोटा व्यापार सुरू केला. यानंतर त्यांनी साबण आणि इतर अनेक व्यापारही केले. या व्यापारांमध्ये धर्मपाल यांचं मन लागलं नाही. अखेर त्यांनी मसाल्यांचा व्यापार सुरू केला. धर्मपाल गुलाटींचे पुर्वजही मसाल्याचाच व्यापार करत होते. महाशय धर्मपाल गुलाटींच्या परिवारानं छोटासा व्यापार सुरु केला. यानंतर त्यांनी हळू हळू दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमधली दुकानं विकत घेतली. कुटुंबानं पै न पै जोडून व्यापार वाढवला. सुरुवातीला मसाले दळण्याचं काम घरी व्हायचं पण व्यापार वाढल्यानंतर आता पहाडगंजच्या मसाला गिरणीमध्ये मसाले दळले जातात. एमडीएचची अधिकृत सुरुवात १९५९ साली झाली जेव्हा गुलाटींनी किर्ती नगरमध्ये एक जागा विकत घेतली आणि उत्पादनला सुरुवात केली. आज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे. चुन्नीलाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत. हजारच्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तारलेलं आहे. अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते. अवघ्या १५०० रुपयांत सुरु झालेला हा व्यवसाय आज कोट्यांची उलाढाल करतोय. एमडीएचच्या जाहिरातीतील पीळदार मिशीवाले ‘दादाजी’ नक्कीच बघितले असतील?… त्याच मसाल्याच्या पॅकेटवर सुहास्य वदनाने झळकणारे, पिळदार मिशीवाले आजोबा मा. धरमपाल गुलाटी हे देशातील सर्वात श्रीमंत कार्यकारी अधिकारी (सीईओ) होते. आज गुलाटी यांचं संपूर्ण कुटुंब – एक मुलगा आणि सहा मुली कंपनीचा सर्व कारभार व्यवस्थित सांभाळत आहेत आणि अर्थातच ‘दादाजी’ त्यांचे मार्गदर्शक होते. २०१९ साली गुलाटी यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण प्रदान करुन सन्मानित करण्यात आलं होतं. गुलाटी हे त्यांच्या वैयक्तिक कमाईतील ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा दान म्हणून देत असत. यापूर्वीही अनेकदा गुलाटी यांच्या मृत्यूसंदर्भातील अफवा इंटरनेटवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळालं होतं. दोन वर्षा पूर्वी गुलाटी यांच्या निधानाचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे पत्रक काढून सांगितलं होतं.
धर्मपाल गुलाटी यांचे ३ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले.
Leave a Reply