सुरुवातीला पोहण्याच्या तलावासाठी तासाला दोन रुपये होते. ते कसेबसे भरुन उन्हाळ्यात का होईना पोरं पोहायला जात. वर्षभर शक्यच नव्हतं. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेला दृष्ट लागेल असा कॉम्प्लेक्स ओसच राहिला. नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने तरण तलाव खाजगी कंत्राटदाराकडे दिला. त्याने तासाची फी १५ रुपये केली. पोरं बाहेरच राहिली.
माझ्या डोळयादेखत त्या मैदानाचा फडशा पडला आणि मी पाहत राहिलो, हळहळलो, पण काही करु शकलो नाही. माझ्यासारखेच आसपास राहणारे सुस्कारा सोडत राहिले. पण काही करु शकले नाहीत.
घराच्या समोर मोठी पडीक जागा होती. कित्येक वर्ष तिथे वेडीवाकडी झुडपं वाढलेली होती. उपनगर वाढत गेलं. इमारती आल्या आणि बघता बघता सर्व परिसर गजबजून गेला. समोरची बरीच मोठी जागा मोकळीच राहली. बहुधा महापालिकेची असावी. आसपासच्या मुलांसाठी खेळण्याची जागा झाली. त्यानंतर तिथे महापालिकेचा स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येणार म्हणून खूप चर्चा झाली. सर्व सोयी मिळणार, पोहण्याचा तलाव, नाटयगृह, टेबल टेनिस, व्यायाम शाळा, लॉन टेनिस वगैरे वगैरे. त्यावर तेथील दोन-तीन नगरसेवक दोन-तीन वेळा निवडून आले. दहा वर्षात स्पोट्र्स कॉम्प्लेक्स तयार झाला. राज्यपालानीं त्याच उद्धाटन केल. खेळाच महत्व सांगणारं भाषण झाल. टाळया झाल्या. आलेली पाव्हणे मंडळी निघून गेली. तिथे खोळणाऱ्या मुलांच्या लक्षात आल, की हे स्पोट्र्स कॉम्पेक्स आपल्यासाठी नाहीत. कारण बिनापैशाचा एकही खेळ इथे नाही. सुरुवातीला पोहण्याच्या तलावासाठी तासाला दोन रुपये होते. ते कसेबसे भरुन उन्हाळयात का होईना पोरं पोहायला जात. वर्षभर शक्यच नव्हतं. कोटयावधी रुपये खर्चून बांधलेला दृष्ट लागेल असा कॉम्प्लेक्स ओसच राहिला. नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने तरण तलाव खाजगी कंत्राटदाराडे दिला. त्याने तासाची फी 15 रुपये केली. पोरं बाहेरच राहिली.
त्यातल्या त्यात एक छोडासा कोपरा त्या कॉम्प्लेक्समधून वाचला. त्यावर एकाच वेळी क्रिकेटच्या चार-पाच टिम्स खेळू लागल्या. तिथं कुणी विचारणारं नव्हतं. पोरानी स्वत:च एक लहानस तारेच कुंपण लावल. त्यावर अतिक्रमण होऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी पालिकेची अतिक्रमणविरोधी गाडी आली. तारेच कुंपण तोडून घेऊन गेली. पोर सावध होती. त्या मोक्याच्या जागेवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेत होती आणि यशस्वी झाली. चार-पाच वर्ष सहज निघून गेली.
डोळयांना दिसणारं अतिक्रमण पोरानी थांबवलेल होते. पण आतल्या बाजूने चोरपावलानी येणार आक्रमण कसं झालं त्यांना समजलही नाही.
त्या मोकळया जागेंत दिवसा मुल खेळायची, संध्याकाळी लोक मुला-नातवंडांना घेऊन फिरायला यायचे. रामलीला, गणपती उत्सव, भांगडा असे कार्यक्रम कुठलंही लेबल न लावता व्हावचे. पण कुणाचा तरी त्या जागेवर डोळा होता आणि एकदा नगरसेवकांच्या आपसातील भांडणामुळे काहीतरी गडबड सुरु आहे हे लोकांच्या लक्षात आल.
क्रिडांगणासाठी ही जागा मुंबईच्या विकास आराखडयात राखीव म्हणून ठेवण्यात आली होती. आता स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधून झाल्यावर उरलेल्या जागेच काम करायच असा विचार आला आणि पब्लिक हॉल्ससाठी ती जागा राखीव करण्यात आली. त्याच्यामागे नगरसेवकाचा हात आहे. तुमची खेळायची जागा जाणार, अस सांगून त्या नगरसेवकाच्या विरोधकाने पोराना उचकावल. नगरसेवकाचा पराभव करुन त्याचा विरोधक निवडून आला. पोरं निर्धास्त राहली. चक्र फिरतच होती. पब्लिक हॉलच्या ऐवजी पब्लिक हॉल कम पब्लिक हाऊसिंग, असे काही तरी नवीन राखीव नामकरण झालेल होत आणि त्यात नवीन नगरसेवकाचाही हात होता.
एक दिवस अचानक एक ट्रक भरुन सामान आलं. गवंडी आले आणि बघता बघता मोकळया जागेभोवती कुपणाची भिंत बांधण्याचे काम सुरु झाल. मुल बिथरली. त्यांनी काम थांबवल. बाचाबाची झाली. बांधकाम करणारा स्वत: हजर झाला. त्याने कागदपत्रं दाखवली. सर्व परवानगी घेतली हाती. पालिकेच्या सांगण्यावरुन काम सुरु होतं. नवीन नगरसेवक आला. मुलांचा मोर्चा घोषणा देत पालिका कचेरीवर. नगरसेवक आणि चार-पाच पोर वॉर्ड ऑफिसरला भेटली. त्यांने सांगितल, काम बेकायदेशीर नाही. महापालिकेच आहे. ठराव संमत झालाय. लोककला सादर करण्यासाठी एक हॉल बांधायचा आहे. बाकी जागा मोकळी राहील. पण महापालिकेच कंपाऊंड राहील. मुल परत आली. भिंत उभी राहिली.
हॉलचं बांधकाम सुरु झाल. उरल्या जागेत पोर खेळत होती. पायाच काम पूर्ण झाल. बीम्स वर निघाले. काम थांबल आणि उरलेल्या जागेत पाया खणण्याचं काम सुरु झाल. मुल बिथरली. परत मोर्चा. उपयोग काही नाही. पार मंत्रालयापर्यंत लोक जाऊन आले. त्यात माझ्यासारखे क्रीडाप्रेमी होते. क्रीडामंत्र्यांनी बांधकामाला मनाई हुकूम दिला. पण तोपर्यंत सर्व मैदान खणून दोन पुरुष उंचीचे खड्डे पाडण्यात आले होते. वीस मजली इमारत उभी राहणार असं बोलल जात होत, पण कुणालाच नक्की माहिती नव्हतं.
काम बंद पडलेले होतं.. पण मुलांचा खेळ बंद झालेला होता. चार-पाच महिने गेले. दरम्यान, मंत्रिमंडळ बदललं. काम परत सुरु झालं. तोपर्यंत विरोध करण्याची कुणाची इच्छाच झालेली नहव्ती. बघता बघता टोलेजंग इमारत उभी राहिली. पब्लिक हॉलचा पाया बांधून वर आलेल्या खांबावर रानटी झाडंझुडप, वेली वाढत गेल्या. तो पूर्ण करण्याचं कुणालाच सोयरसुतक उरलं नाही. त्याच उंच इमारतीमुळे रस्त्यावरची वर्दळ इतकी वाढली की मुलांना दुपारच्या निवांत वेळी रस्त्यावर खेळणंही अशक्य झालं.
विकास आराखडयातील तरतुदींचा वापर करुन मूळ हेतूलाच बगल देण्यात आली होती. बघता बघता मैदानाचा फडशा पडलेला होता.
———————————————————————–
— प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक : 21 एप्रिल 1994
Leave a Reply