माझ घर म्हणजे एक प्रचंड विशाल बंगला होता. शासकीय कॉर्टर. वडील शासनाचे जिल्हाधीकारी अर्थात् Collector of District होते. एक मोठे सरकारी आधिकारी. नोकर चाकर, घरांत काम करणारे अनेकजण, सर्वांचा एक दबदबा दिसून येई. सर्व आधिकारी वर्ग व सामान्य नागरिकांची तेथे सतत जा ये चालू असे. आम्ही ब्राह्मण असलो तरी बडीलांचे शिक्षण व अधिकार यांचा त्यांच्या मनावर जबरदस्त पगडा झालेला होता. ते जात पात ह्या संकल्पनेला केव्हाच मानीत नव्हते. शिज्ञण व ज्ञानच माणसाला खऱ्या अर्थाने संस्कारीत करत असते ही त्यांची धारणा. धर्म व कर्मकांड जर पाळावयाचे असतील तर ते फक्त घराच्या चौकटीतच असावे ही त्यांची धारणा.
( काळाप्रमाणे चालावे लागते म्हणतात , माझी आजी अर्थात त्यांची आई हीचे देखील केशवपन झालेले होते. ती खुप धार्मिक व जुनी विचारसरणी सांभाणारी होती. मात्र हे सारे स्वतः भोवतीच असे. देवघर व स्वयंपाकघर हेच तिचे लक्ष होते. )
माझ्या आग्रहाने मारुती प्रथम माझ्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडासा दबकेपणा स्पष्ट दिसत होता. भव्य घर, प्रशस्त हॉल, फर्नीचर, सोफासेट, पंखे, पडदे, नोकर चाकर, हे बघून मारुती हादरुन गेला. सभोवतालची भव्यता त्याचे डोळे टिपून घेत होत असलेले जाणवले. त्याला मी खुर्चीवर बसवले. समोर आराम खुर्चीवर वडील पेपर वाचीत बसले होते. मी त्याना सांगितले. “ हा मारुती माझा मित्र. आम्ही रोज शाळेच्या मैदानांत एकत्र खेळतो. “ वडीलांनी त्याच्याकडे नजर टाकली.
“ छान खुप खेळत जा. अभ्यासही मन लाऊन करीत जा. ज्ञान व आरोग्य ह्या अत्यंत महत्वाच्या जीवनातील गोष्टी “
मारुतीने उठून त्यांच्या पुढे जात वाकून नमस्कार केला. आईने नोकरातर्फे कांही फळे बशामध्ये घालून पाठविली, ती दोघानी खाली. नंतर मारुती व मी दोघेजण बाहेर खेळण्यासाठी गेलो.
अर्थात हे सारे त्यावेळच्या काळ व परिस्तिती प्रमाणे होते. जीवनाची दोन टोके. एकात होती भव्य दिव्यता. सुस्थिर आर्थिक परिस्थिती. हाताशी प्रत्येक गोष्ट सहजपणे साध्य
होण्याची शक्यता. तर दुसरीकडे नजरेंत भरेल अशी गरीबी, असहायता, जगण्यासाठीची धडपड. परंतु हे सारे आजच्या चश्म्यातून बघताना, त्यावेळी जरी हेच होते, तरी त्या बाल वयांतील मनाला कोणतीच पर्वा नव्हती. काळजी नव्हती. आम्ही फक्त मित्र एकत्र राहू, खेळू, इच्छीणारे होतो. ह्याच अंतरीक इच्छेपायी परिस्थितीच्या भिन्नतेची गढद काळी छाया आमच्यावर पडू शकली नाही. त्याचा आम्ही केंव्हाच स्विकार केला नव्हता. याच कारणास्तव जीवनरेखा वेगळ्या तरीही समांतर जात होत्या.
बाल वयांत मारुती सर्वच खेळांमध्ये माझ्या बरांच वरचढ होता. मोज मापत जर बोलावयाचे तर तो पाचपट माझ्यापेक्षा खेळांत पुढेच असावयाचा. हां ! मात्र त्याच काळातील अभ्यासामधील प्रगतीचा जर शोध वा आलेख घेतला, तर मी त्याच्या पुढे नेहमी दोन पाऊले जास्त होतो. हे ही एक सत्य आहे. माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील, त्याच्यापुढे असण्याचे कारण, मला त्याच वेळी नजरे समोर आलेले मी जाणले.
मारुती नियमीत घरी येत असे. गप्पा, चर्चा, सतत होत असे. तो खेळण्याच्या गप्पामध्ये रस घेत होता. तर मी पुस्तकामधील वाचलेले सांगुन त्याची व पर्यायाने दोघांची करमणूक करीत असे.
एका दिवसाची घटना मला फार चांगली आठवते. आम्ही दोघे बोलत बसलो होतो. अभ्यासा संबंधी विषय होता. मी त्याला म्हटले “ मारुती ह्या पुस्तकामधील पांच गणित मी सोडवतो. तीच तु पण सोडव. आपण दोघे उद्या सकाळी त्याची उत्तरे बघूत.” मारुती लगेच म्हणाला “ मी रात्रीचा अभ्यास करीत नसतो. जेव्हां जमेल तेव्हां फक्त दिवसाच करतो. मला आश्चर्य वाटले. “ आरे मी तर रोज रात्री तासभर तरी अभ्यास करीत असतो. रात्री जेवणानंतर एक तास मी अभ्यासांत खर्च करतो. चांगले असते. वातावरण पण शांत असते.” मारुती शांत मनाने ऐकत होता. “ भगवान मलापण रात्रीचा अभ्यास करणे आवडते. परंतु आमच्या घरी दिवा नाही. कंदील वा चिमणी नाही. अंधारांमुळे अभ्यास करता येत नाही. मारुती एकदम गप्प झाला. “
घरांत शेजारच्या खोलीत वडील वाचत पडलेले होते. आमचे बोलणे त्यांच्या कानावर पडले. त्यानी चटकन आम्हा दोघाना हाक दिली. “ मारुती तु कोठे रहतोस.? जर जवळच असेल तर रोज रात्रीचा येथेच ये. तू व भगवान मिळून अभ्यास करा. तुझी सर्व सोय केली जाईल. फक्त तुझ्या घरी वडीलांना विचारुन दररोज येत जा. “
हाच एक अत्यंत महत्वाचा क्षण, माझ्या जीवनाशी संबंधीत झाला होता. जो एक Life Turning point ठरला गेला. आमच्या मैत्रीचे, आपुलकीचे धागे आवळत चालले होते. त्याची चेतना व साथ घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडूनच मिळत गेली. आम्ही दोघे दररोज नियमीतपणे अभ्यास करीत असू. अभ्यास करण्यासाठीच्या सर्व तांत्रीक बाबी वा
सोई घरातूनच व्यवस्थीत मिळू लागल्या. कोणतीही गैरसोय होत नव्हती. आमची अभ्यास करण्याची वेगळीच पद्धत निर्माण झाली होती. आणि ती बाब आमच्या दोघांच्या आवडी व स्वभावानुसार निश्चीत होत होती. मला पुस्तक वाचणे आवडायचे, तर त्याला केवळ ऐकून ज्ञान मिळवण्यात आनंद वाटे. तो मात्र अतिशय लक्ष केंद्रित करुन ऐकत असे. थोडेसे वाचन, त्यावर चर्चा ही पद्धत आम्ही अंगीकारली होती.
येथेच एक अत्यंत महत्वाचे Observation सांगतो. आमची दोघांची अभ्यास करण्याची ही सवय वा पद्धत , आम्ही फक्त बालवयांतच अंगीकारीत होतो, असे नव्हे, तर तशीच पद्धत पुढे भावी वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही योजीत होतो. तसाच अभ्यास औरंगाबादला मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना देखील करीत होतो. एका खोलीत बसून अभ्यास करीत असू. Medicine, Surgery, Gynecology, आणि इतर वैद्यकीय पुस्तके आम्ही मिळून वाचीत असु. चर्चा करीत असू. तेथेही मी प्रत्यक्ष पुस्तक वाचत होतो, व तो समोर बसुन ते वाचन लक्ष देऊन ऐकत असे. चर्चा होई, एकमेकांच्या चुका वा समज दुरुस्त केल्या जात असे. हीच ज्ञान साधना पद्धती, प्रक्रिया शैक्षणीक काळ पर्यंत जोपासली होती.
बालपणी आभ्यास करताना आई सरबत. दुध, फळे, वा खाण्याचे पदार्थ देत असे. आमचा तो विश्रांतीचा काळ ( Interval ) मजेत जात होता.
मी माझ्या वडीलांना “ भाऊ ” व आईला “ ताई “ ह्या नावांनी संबोधीत असे. अर्थात नाम संबोधन ही प्रक्रिया जुन्या काळी साचेबद्ध नव्हती. तेथे आजकालचे मार्गदर्शन मुळीच नव्हते. घरांतील वडील मंडळी जे म्हणतील, जसे संबोधन करतील तेच लागु होत असे. तेथे न नियम होते ना पद्धती. मोठे मामा माझ्या वडीलाना “ भाऊ “ म्हणाले, माझ्या आईला ते
“ ताई “ संबोधायचे. बस असेच आम्ही भावंडानी त्याचे नामकरण अंगीकारले. त्याला त्या काळी कुणीच विरोध केला नसेल, आणि मान्यता मिळाली. नात्याच्या स्तरावर बाबा, आई, मामा, काका, आत्या, दादा, ताई, आक्का इत्यादी नाते नामकरणे त्या काळी वेगळीच होऊन जात होती. ह्यातूनच बप्पा, आबा, बापू, मा, माई, बाई, दीदी, अम्मा, इत्यादी प्रकारची नामावळी होती. हे नांव उच्चरल्या नंतर ते माझे कोण हे कित्येक वेळा सांगणे गरजेचे होई. आई, बाबा … म्हणताच नात्याचा इतरांना बोध होतो, तसे बापू, अम्मा …. इत्यादीत उलगडा करावा लागे.
मारुती देखील माझ्या वडीलांना भाऊ व माझ्या आईला ताई याच पद्धतीने संबोधीत असे. जणू त्यानेच मैत्रीचे नव्हे तर बंधूत्वाचे नाते आमच्या घराण्याशी निर्माण केले होते.
मारुती व मी दोघे रात्री अभ्यास करुन बरोबर रात्री १० वाजतां झोपत असू. घरांत एक गजराचे घड्याळ मजसाठी दिलेले होते. रोज आम्ही गजर लाऊन सकाळी पांच वाजता उठत असू. घराच्या मागील परसदारी एक मोठी विहीर होती. त्यावर पाणी काढण्यासाठी रहाटचक्र पक्के लावलेले होते. सकाळीच आम्ही पाणी काढीत असू. गम्मत म्हणजे सकाळचे पाणी खुपच गरम असायचे. वातावरणाच्या मानाने एकदम कोंम्बट ( Warm water ) . आम्ही हात पाय धुवुन खोलीमध्ये थोडावेळ अभ्यास करीत असू.
एकदा कुलकर्णी गुरुजी म्हणाले होते सकाळी गार पाण्याने स्नान करणे प्रकृतीसाठी फार चांगले असते. बस माझ्या डोक्यांत ते शिरले. तसे सकाळचे नुकतेच उपसलेले पाणी खुपच गरम असते. मी पण ठरऊन टाकले की आपण गार पाण्याने स्नान करावे. दुसऱ्याच दिवशी मी सकाळी उठताच विहीरीच्या गार पाण्याने स्नान करु लागलो. मारुती मला मदत करीत असे. तो पाणी उपसुन देई. ती बादली भरुन काढलेले पाणी माझ्या अंगाखाद्यावर टाकीत असे. दोन चार बादल्या पाणी उपसले जाई. मारुती ह्यात सहकार्य व मेहनत घेई. असे बराच काळ पुढे चालले.
पुढचा भाग पुढील अंकात—
डॉ. भगवान नागापूरकर
Leave a Reply