माझ्या भोवताली,
माणसांचे रान,
चहूबाजूंना असूनही,
वाटा सुनसान,–!!!
टोचे सले असे एकटेपण,–!!
माझ्या भोवताली,
नातीगोती किती,
प्रश्न एकच पडे,
विचारती किती,–
टोचे सले असे एकटेपण,–!!
माझ्या भोवताली,
मित्रपरिवार किती,
असंख्य हात निव्वळ,
फक्त वर ते उठती,
टोचे सले असे एकटेपण–!!
माझ्या भोवताली,
पिके खूप मतांची,
उपयोगाला येती,
त्यातील का कधी,–!!
टोचे सले असे एकटेपण–!!
माझ्या भोवताली, दे
कितीक सहयोगी,
असते का त्यांना,
आंच हितचिंतनाची,–?
टोचे सले असे एकटेपण,–!!!
माझ्या भोवताली,
माझे असे किती,
प्रेम माया कुठली,
आणावी आपुलकी,–
टोचे, सले, असे एकटेपण–!!
माझ्या भोवताली,
इहलोकातील गर्दी,
प्रांजळ निर्मळ,
भावना कोणाची खरी,–
टोचे सले असे एकटेपण,—!!!!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply