माझ्या मलमली मिठीत
तू सख्या विरघळावे,
घेता जवळ घट्ट तू मजला
चांदणे आकाशी बहरावे
मखमली स्पर्श तुझा होता
रोमांचित तन मन व्हावे,
बेधुंद तू हो जरासा मग
अलगद मी मोहरुन यावे
मोह पडला तुझ्या मिठीचा
नकळत भाव गुंतून गेला,
मी लुटले पुरती मोह भावात या
तू दूर जाशी उलगडून जाणिवा
ओठ मलमली मोहक माझे
घे टिपून तू आल्हाद जरा,
लाज येईल गाली हलकेच
चांदण्याही लाजतील अबोलशा
ओढ तुझ्या राकट मिठीची मज
गंधाळून जाते तप्त अबोल काया,
होतील मुग्ध मोहक गंधित भावना
लाजेल मी मुग्धशी तुझ्यात तेव्हा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply