ऐअर इंडिया डब घाईला आलेली आहेच पण त्याच बरोबर भारतातील सर्वात मोठी कंपनी भेल सुद्धा गेली ५ वर्षे सातत्यानी कमी नफ्यात चालत आहे .२०१२ साली या कंपनीचा निव्वळ नफा ७०३९ कोटी रुपये होता .तो दरवर्षी घसरत मार्च २०१५ मध्ये १४१९ कोटी रुपये इतका घसरला.सरकारी कंपन्यांची हि अवस्था का होत आहे याचे उत्तर खरे तर नव्या सरकारनी शोधायलाच हवे.एकेकाळी या दोन्ही कंपन्या ”उत्तम” या सदरात मोडत होत्या.पण या कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण लक्षणीय घसरण्याचे कारण काय ? सरकारी अनास्था आणि खासगी कंपन्यांचे भले करण्याची मागील सरकारची परंपरा पुढे चालत राहणार असेल तर संपूर्ण देशाचेच खासगीकरण होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे असेच म्हणावे लागेल.एकेकाळी या देशात ऐअर इंडिया हि कंपनी अत्यंत अभिमानाची कंपनी होती.सरकारनी हि कंपनी चालवायला घेतली आणि या कंपनीचा पद्धतशीर ऱ्हास सुरु झाला.ऐअर इंडिया कधीही बंद पडेल अशी परिस्थिती कोणी आणली ? सरकारी कंपन्यां वर संचालकांची नेमणूक कशी होते हे नव्याने सांगायला नको.
ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोईका आणलेल्या रशिया मध्ये याच openness आणि restructuring चा परिणाम चांगला झाला हे सर्वांना माहित आहेच पण कुठलीही गोष्ट देशात लागू करताना लोकांच्या फायद्या पेक्षा संधी साधू लोकांचा फायदा आधीक होतो यासाठी राजकीय आत्मबल फार महत्वाचे आहे.मोदी सरकारने हे आत्मबल जनतेला दाखवून देणे गरजेचे आहे.नाहीतर भा ज पा चे नुकसान होईलच पण देशात न भूतो न भविष्यति इतका गोंधळ उडेल.
विरोधी पक्षांचा वकूब चांगला नसेल तर त्यांना चागल्या कामात खीळ घालायला आवडते पण चागले काम करून दाखवता येत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.मेक इन इंडिया करताना ग्रामीण भागापासून सुरवात करावी हि मागणी लावून धरली पाहिजे.
ग्रामीण रोजगार , शेती, ग्रामीण भागातील infrastructure हे कमालीचे मागासलेले असताना मेक इन इंडिया मध्ये ग्रामीण भागाकडे खूप मोठा निधी वळवला पाहिजे स्थलांतर थाबले तर प्रश्न कमी होतात हे जागतिक सत्य आहे.ग्रामीण भागातून स्थलांतर थाबले नाही तर उद्या आकाशात जरी शहरे बांधली तरी लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत .
मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी ची सुरवात ग्रामीण विकासा पासून करा अख्खा देश “स्मार्ट” बनेल .
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply