उडत उडत एक मक्षिका,
देवघरांत शिरली,
पूजा- साहित्य आणि मूर्तीवरी
स्वच्छंदानें नाचूं लागली ।।१।।
धुंदीमध्ये बागडत होती,
मूर्तीच्या बसे शिरावरी,
धूप, गंध आणि सुमनावरूनी,
जाई मध्येच प्रभू चरणावरी ।।२।।
पंख चिमुकले हलवीत ती,
मूर्तीपुढें गांऊ लागली,
प्रसाद दिसतां पंचामृताचा,
प्रभू अर्पिण्यासी झेपावली ।।३।।
नैवेद्याच्या क्षीर सागरीं,
आत्मसमर्पण तिने केले,
प्रभू सेवेत तल्लीन होऊनी,
जन्माचे सार्थक केले ।।४।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply