अजूनी दिसेना पंढरीचा राणा
मला विठ्ठलाचा विरह सोसवेना ।।
बुवा-साधु-स्वामी यांचे पाय वंदिले मी
पुराजी नि पंडित यांचे पंथ धुंडले मी
परी विठ्ठलाच्या दारीं कुणी पोंचवेना ।।
पांडुरंगभेटीपुढती खुजे सप्तस्वर्ग
दुबल मी, दुर्गम दुष्कर नरजीवनमार्ग
पदोपदीं सहा रिपूंची रोखतसे सेना ।।
अंधच मी, पाहिन कैसे सुंदर तें ध्यान ?
मूढ पुरा , गूढ सारें परब्रह्मज्ञान
ध्यास असुनीही विषयपाश तोडवेना ।।
— सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
Leave a Reply