कोणत्याही रोगाचे निर्मूलन करताना लोकशिक्षणाची गरज हा मुख्य घटक असतो . Prevention is better than cure असे म्हणणे सोपे आहे परंतु त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करणे तितकेच कठीण आहे . मलेरिया हा रोग होण्यास डास हा मुख्यतः जबाबदार असल्याने त्याच्या निर्मूलनाच्या विविध पद्धती दाखविणारे तक्ते , व्हिडीओ फिल्म्स् या शाळा , कॉलेजे , ऑफिसेस् व वस्त्यांमधून दाखविणे आवश्यक आहे . शहरामध्ये शेकडोंनी बाहेर गावाहून येणारे मालवाहू ट्रक्स् , बसेस् तसेच रेल्वेचे डबे हे डेपोत व यार्डात जातात . त्यावेळी त्या गाड्या व डब्यांखालील चेसिस् व चाकांच्या खोबणीत असंख्य डास लपलेले असतात . त्यांच्यामुळे आजूबाजूच्या नागरी वस्त्यांमधून मलेरिया रोगाचा फैलाव होतो . मलेरिया झालेल्या रुग्णांना त्यावरील औषधे योग्य वेळी व योग्य प्रमाणात मिळणे अत्यंत गरजेचे आहे . जे प्रवासी मलेरियाचा प्रादुर्भाव नसलेल्या प्रदेशातून मलेरिया ग्रस्त भागात जातात तेव्हा त्यांना रोगप्रतिबंधक औषधे त्या प्रदेशात शिरण्यापूर्वीच दिली जाणे अत्यंत गरजेचे आहे . मलेरिया या रोगासंबधी सामान्य लोकांना प्राथमिक स्वरुपाची माहिती देणारा एक तक्ता मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केला होता . त्याचा हा नमुना
मलेरिया
महत्त्वाची लक्षणे प्रतिबंधक उपाययोजना
ताप घराच्या आजूबाजूस पाण्याची डबकी
हुडहुडी व थंडी तयार न होऊ देण्याची खबरदारी घ्यावी .
डोकेदुखी पाणी साठविण्याची पिंपे व भांडी
अंग दुखणे झाकून ठेवावीत
उलटी व उमासे येणे
खोलीमध्ये Indoor residual spray ( IRS ) कीटकनाशकाचा फवारा मारावा. जास्त काळ टिकणाऱ्या व कीटकनाशक रसायनाचा लेप असलेल्या मच्छरदाण्या वापराव्यात . ( Long lasting insecticidal ( LLIN ) गरोदर स्त्रिया व लहान मुले यांनी वरील प्रकारच्या मच्छरदाणीत झोपणे अत्यावश्यक आहे.)
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply