नवीन लेखन...

मलेरिया : प्रतिबंधात्मक उपाययोजना – २

डासांच्या दंशाचा प्रतिबंध करण्यासाठी झोपताना अंगभर कपडे घालावे, उघड्यावर झोपू नये. शक्यतो कीटकनाशक द्रव्यात बुडवून मग सावलीत वाळविलेल्या मच्छरदाण्या वापराव्यात. सुतापेक्षा नॉयलॉन टिकते व त्यावर कीटकनाशकही टिकते त्यामुळे नॉयलॉन मच्छरदाण्या जास्त चांगल्या.

कीटकनाशक मच्छरदाण्या न धुता ६ महिन्यांपर्यंत वापरू शकतो. नंतर पुन्हा त्या कीटकनाशक द्रव्यात बुडवून ठेवून सावलीत वाळत घालून वापरता येतात. मच्छरदाणी शक्यतो पांढरी असावी त्यामुळे डास दिसण्यास मदत होते. मच्छरदाणीच्या एका चौरस इंचात १५० छिद्रेच असावीत. जाळीचे छिद्र ०.०७५ इंचापेक्षा मोठे नको. मच्छरदाणी वापरल्याने डासांशिवाय इतर कीटकांपासूनही संरक्षण मिळते.

डास दूर करणारी मलमे (रिपेलण्ट) पण अंगाला लावू शकता. मलमाच्या वासाने डास जवळ येत नाहीत. मलमातले द्रव्य चटकन उडून जाणारे असते. मलमाचा परिणाम काही तासच राहतो. कीटकनाशक अगरबत्ती वा विजेवर चालणारी कीटकनाशक उपकरणेही डासांना दूर ठेवता येते. पंखा वेगाने सोडल्यास डास दूर जातात. खिडक्या, दारांना व झरोक्यांना बारीक धातूची जाळी लावल्याने डास घरात येण्यास प्रतिबंध होईल. या जाळीच्या छिद्राचा आकार ०.०४७५ इंचापेक्षा मोठा नको. हा उपाय महाग आहे; पण जास्त परिणामकारक आहे.

प्रवासाला जाताना मलेरिया प्रतिबंधक गोळ्या घेण्याची गरज नाही; पण परदेशातून (जेथे मलेरियाचा प्रादुर्भाव नाही तेथून) आलेल्या व्यक्ती भारतात येण्याआधीपासूनच या गोळ्या घेण्यास सुरुवात करू शकतात. या गोळ्या आठवड्यातून एकदाच घ्यायच्या असतात. येण्यापूर्वी एक आठवडा, वास्तव्य असेपर्यंत आणि गेल्यानंतरही ४ ते ५ आठवडे या गोळ्या घेणे आवश्यक आहे. वार नक्की करून प्रत्येक आठवड्यात त्याच दिवशी घेणे चांगले. हे सगळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचे आहे. कुठल्याही तापाकडे दुर्लक्ष डॉक्टरांच्या हिवतापावरील नका. सल्ल्यानुसार गोळ्यांचा कोर्स पूर्ण करा. मराठी विज्ञान परिषद Plasmodium Vivax_मुळे झालेला मलेरिया असेल तर मलेरिया पुन्हा उलटू नये म्हणून ‘प्रायमाक्वीन’चा १४ दिवसांचा कोर्स पूर्ण करण्यास कुचराई करू नका. मलेरियाचा प्रतिबंध करणे ही सरकारबरोबर आपलीही सामूहिक जबाबदारी आहे. मलेरियाविरुद्ध सध्यातरी प्रभावी लस उपलब्ध नाही. त्यावर बरेच संशोधन चालू आहे.

-डॉ. दक्षा पंडित
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..