आता काय बोलायाचे
आता काय ऐकायाचे
घडणारे ते घडूनी जाते
सारे समजून घ्यावयाचे
तडजोडित, मन:शांती
शल्य कुणास सांगायाचे
स्वप्नी आठवांचे मोहोळ
सांगा ? कसे थोपवायचे
ऋणानुबंध गतजन्मांचे
सारे सावरित जगायाचे
मैत्र! निर्मोही सावरणारे
तेच सदा अंतरी जपायचे
मुक्तिचाच ध्यास जीवाला
हरिनामात सुखी रमायचे
— वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३०४
२५/११/२०२२
Leave a Reply