सखये सृष्टिलाही स्वप्न तुझे
ऋतुं ऋतुंतूनी तूं झुळ झुळते….
ऋतुं रंगली, तुं स्वरूप सुंदरी
चैतन्याला मनमुक्त उधळीते….
कुसुम सुमनी, तुझेच दरवळ
कांचन किरणातुनी तू स्पर्शते….
तव अधरीचे, हास्य श्रावणी
मन मनांतर, मोहरुनी जाते….
तूच अंतरी सप्तरंगले इंद्रधनु
आत्म सुखाची प्रचिती असते…
तूच श्रावणातील श्रावणधारा
अव्यक्तालाही चिंब भिजविते….
क्षण हेच खरे अवीट ब्रह्मानंदी
निर्झरी, संथ गुणगुण तोषविते….
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र.१९५
१०/८/२०२२
Leave a Reply