मनाच्या नदीने कसं
वाहतच रहावं
झाले गेले सारे
ते विसरून जावं
वाटेवरच्या वळणावर
थोड्यावेळ थांबावं
अपरिचित काही मनांना
प्रेमानं जोडावं
मनाच्या काठावर
कधी शांत बसावं
चिंता विवंचनांना
अलगद पाण्यात सोडावं
येणाऱ्या साऱ्या प्रवाहांना
आपल्या पोटात घ्यावं
जिवलगांच्या दूःखांना
कसं प्रेमाने सहावं
मनाच्या नदीने कसं
वाहतच रहावं
मनाच्या नदीने
कसं संयमाने वहावं
संतापाच्या परिणामांना
शांत प्रेमानं भरावं
मदत हवी त्यांच्याकडे
जरूर कधी वळावं
पण आपल्या ध्येयापासून
कधी नाही ढळावं
मनाच्या नदीने कसं
जास्त नाही रेंगाळावं
चंचल अशा मनाला
त्या विध्यात्यास अर्पावं
मनाच्या नदीने कसं
वाहतच रहावं
झाले गेले सारे
ते विसरून जावं.
– डॉ.सुभाष कटकदौंड