माणसांचा खोटा बाजार पाहिला
वेदनेचा खरा अंगार डोळ्यांत विझला
तप्त डोळ्यांत काहूर हलकेच उठता
शब्दांच्या दुनियेत खेळ व्यक्त रंगला
कोण न कोणाचे आयुष्य वेचता
व्यर्थ जीव गहिरा डोह साचला
भरुन आभाळ घन मेघांनी
परी एक ढग झाकोळून कोरडा
माणसांची जत्रा सारी भरली
खऱ्या खोट्याचा आव भिनला
प्रेम न आपुलकी किंचित कसली
निव्वळ हास्याचा खोटा भाव रंगला
माणसाने संपविले माणूसपण अजाणता
हृदयात बंदिस्त भावना साऱ्या रडल्या
विझले डोळे जग कोरडे असे पाहून
व्यापार रोज भरे इथे माणुसकीचा अंत दिसला
हिरवळ सुंदर भवती शेत डोलती वाऱ्यावर जरा
निसर्गाचा खेळ अद्भुत माणुस खुजा आहे खरा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply