हा फोटो नीट पहा.
आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेफ थॉ़म्पसनने ७ खेळाडुंना क्षेत्ररक्षण करण्यासाठी अगदी फलंदाजाजवळ लावले आहें. म्हणजे यष्टी रक्षक तसेंच स्वतः मिळुन असें नऊ खेळाडु खेळपट्टी जवळच आहेत. राहता राहीलें २ खेळाडु उर्वरीत मैदानात क्षेत्र रक्षणासाठी उरतात.
उल्लेखनीय बाब म्हणजे समोर फलंदाज आहें इंग्लंडचा अॅलन नॉट. हा एक नावाजलेला फलंदाज होता. तो सहज असा बाद होत नसें. तसेंच उत्क्रुष्ट यष्टीरक्षक म्हणुनही याची ख्याती होती.
अशा या फलंदाजास असें आक्रमक क्षेत्ररक्षण तेही वेगवान गोलंदाजानं लावणे निश्चितच धाडसाचे, कारण वेगवान गोलंदाजावर हुक, किंवा चेंडुला नुसती बॅट लावली तरी चार किंवा सहा धावा आरामात निघण्याचा धोका असतो. असे असुनही जेफ थॉमसने असें आक्रमक क्षेत्ररक्षण लावले आहें तें तेही अॅलन नॉट सारख्या फलंदाजा विरोधात लावले हें निश्चितच कौतुकास्पद आहें.
उद्देश हा कि मानसिक दबाब आणुन लवकर बळी मिळविणे. माझा असा प्नश्न आहें किं सध्याचे गोलंदाज असें क्षेत्ररक्षण मोठ्या फलंदाजा विरोधात लावतील का ? बहुतेंक उत्तर नाही असेच येईल ? कारण असें करण्यास सध्याच्या गोलंदाजात निश्चित धमक वा धाडस नाही. असें म्हणावे लागेल.
इति लेखन सीमा, -अनिल भट
Leave a Reply