चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ,समर्थशिवाय शिवाजी ला कोण विचारेल? असे एकेरी वक्त्यव्य राजे शिवाजी बद्दल कुणी माथेफिरूने केलं नसून राज्याचे घटनात्मक पदावर बसलेली व मागील काही वर्षां पासून महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जेष्ठांचे अनादर करणारे महामहिम राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 व्या दीक्षांत समारंभात आपल्या स्वभाव व विचारानुसार परत एकदा कोश्यारी म्हणतात,विद्यार्थी मित्रांनो,तुम्हाला जर कोणी तुमचे आदर्श विचारले तर तुम्ही नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे नाव घ्या. तेच नव्या युगाचे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी तो अब पुराने युग की बात हो गयी है..!
राज्यपालांचे वक्तव्य हे दळभद्री आहे. एवढेच नव्हे तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली, असे वक्तव्य एका नॅशनल चॅनेलवर केले. छत्रपती शिवाजमहाराजांचा अपमान सत्ताधारी पुरस्कृत राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का?
राज्यपालांनी यापूर्वीही शिवाजी महाराजांचा तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. एका वर्षात या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार वेळेस दुखावले आहे. हीच आपली अधिकृत भूमिका आहे का ? वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त बोलल्यास भाजप पेटून उठतो. जोडे मारो आंदोलन करतो. त्याचे स्वागतच आहे. मात्र, शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल हे जोडे आता कोणाला मारणार, राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदीना की राज्यपालांना ? असे शिवप्रेमी विचारू लागलेत.
खरंतर राज्यपाल महोदयांनी राजे शिवाजी बद्दल अवमान कारक जे बोललेत त्यात त्यांची काही चूक नसावी, कारण ज्या संस्कारात ते वाढले शिकले तेच ते वक्त्यव्य केले असावे ? काळ्या टोपीच्या खाली विकृतीचा इतिहास दडलेला आहे का ? असाही प्रश्न आत उपस्थित होऊ लागला.
ज्या काळात बालविवाह हा भारतातील अपवादापेक्षा नियम होता, कोशियारी सांगतात की ज्योतिबा १३ वर्षांचे होते आणि सावित्रीबाई फक्त दहा वर्षांच्या होत्या. ते सामाजिक भाष्यापुरते मर्यादित न ठेवता त्या वयात त्यांनी त्यांचे लग्न कसे पार पाडले असेल याचे आश्चर्य वाटून तो अश्लील भावनेने त्यांचे निरीक्षण होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. मुंबईच्या अंधेरी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना, कोश्यारी म्हणतात, महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि ठाण्यात गुजरातींना हटवा, राजस्थानी हटवा, इथे एकही पैसा शिल्लक राहणार नाही. त्यानंतर मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाणार नाही,मराठी माणसांबद्दल राज्यपालांच्या मनात असलेला द्वेष नकळत बाहेर आला.राज्यपालांनी सुधारायचे नाही अस ठरवलेले दिसतेय. राज्याच्या घटनात्मक पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीकडून अशी बेजबाबदार विधाने वारंवार होत असतील, तर त्याला वैद्यकीय भाषेत मानसिक विकृतीचे लक्षण म्हटले जाते.
केंद्राने राज्यपालांना परत बोलावण्याची वेळ आता आली आहे. जर कोश्यारी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना घरी परत पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे याचा विचार व्हायला हवा. गेल्या तीन वर्षांत त्यांनी महाराष्ट्रात राहून मराठी भाषिक लोकांचा अपमान केला आहे. राज्यपाल महोदय महाराष्ट्राचे वैभव धुळीस मिळवतायत. असा घाणेरडा विचार घेऊन ते येऊच कसे शकतात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही.
विद्यापीठ ही उच्च शिक्षण व संशोधनासाठीची संस्था असते. विद्यार्थ्यांना विविध विषयातील पदवी प्रदान करण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असतात.कुलपती हे पद विद्दयापीठ कार्यकारिणीतले सर्वोच्च पद असून कुलगुरू हा विद्यापीठाचा कार्यकारी प्रमुख असतो. भारतामध्ये कोणत्याही राज्याचा राज्यपाल हा त्या राज्यातील सगळ्या विद्यापीठांचा आसनाधिष्ठीत कुलपती असतो. विद्यापीठा कडून उच्च शिक्षणा साठी प्रदान केल्या जाणाऱ्या मुख्य पदव्या:PhD/M/Phil/ MA/MCom/M.SC,LLB/LLM असे व इतर अनेक अभयसक्रम असतात.मात्र,अशा विद्यापीठाचे आसनाधिष्ठीत कुलपती हे खोडसाळपणा किव्हा कुठल्या पक्षाचा व संघटनेच्या विचारांवर कार्य कारित असेल तर ? हि फार गंभीर बाब आहे. विद्यापीठाच्या परीक्षेत विद्यार्थ्याने चुकीचे लिहल्यास “Failed” म्हणून गुणपत्रिकेवर दर्शविले जाते. येथे तर स्वातंत्र्याच्या अमृत मोह्त्सवात विद्यापीठाचे कुलपतीच चुकलेला दिसतोय. तर, त्यांना “Failed” घोषित करून त्वरित महाराष्ट्रातून त्यानं निरोप द्यावे अशी अनेक शिवप्रेमींची इच्छा असल्याचे जाणवते.
ऍडव्होकेट (डॉ.) सागर शंकरराव शिल्लेदार,
(कार्यकारी सद्यस्य: संविधान सेवा मंच,महाराष्ट्र राज्य)
किनवट जी नांदेड . © 9421764699.
Leave a Reply