मानवता आहे जगात,-?
प्रश्न खूपदा पडे,
आई बापा टाकून देतात,
कोणते पुण्य मग मिळे,–?
संसारी रममाण होतात, भूतकाळाचा पडे विसर,
उभे ज्यांनी केले ते,
वृद्धाश्रमी सापडतात,–!!!
हेच संस्कार मुलांवर,
का बरे करतात,–?
आईबापाला अंतर देऊन,
कोणते समाधान मिळवतात,?
वरील चित्रफितीतुनी,
कोणता मिळे संदेश,
वागणे प्राण्यांचे पहा,
प्रेम केवढे हे विशेष,–!!!
जिने त्यांना सांभाळले,
माया ममता दाखवून,
इतकी वर्षे गेली मध्ये,
तरी ना गेले ते विसरून,–!!!
हिंस्त्र प्राणी म्हणत म्हणत,
जग त्यांना हिणवते,
माणसांहून भावना थोर प्राणिजगत सांभाळते,–!!!
*प्रेम त्यांचे असते मूक,
तरीही किती बोलके,
अनुभव घ्यावा त्यांचा,
ठरतील श्रेष्ठ ते शेलके*,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply