परमेश्वर अगाध । त्याच्या शक्तीचा नसे वाद
मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक
नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती
प्रभु निराकार । निर्गुण असुनी होई साकार
आस्तिक प्रभु मानती । नास्तिक समजती शक्ति
ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता
न प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून
वापरुन ज्ञान शक्ति । अनेक धर्म स्थापिती
धर्म मार्गदर्शक । सत्य सहिष्णुतेचा शोधक
हीच खरी मानवता । तीच विसरतो आतां
झगडे मार्गासाठीं । ध्येय मात्र विसरती
धर्मासाठीं भांडण । मुर्ख त्याहूनी कोण
भांडतो करवंटीसाठी । विसरुनी खोबरे वाटी
होता अतिरेकी । बनती सर्व दुःखी
वाद करती विद्वान । सामान्यांस विचारी कोण
समजून घ्यावे सर्व धर्म । हेच मावतेचे मर्म
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply