नवीन लेखन...

मंगलाष्टक वन्स मोअर

अलिकडे आपल्या चित्रपटांमध्ये “लग्नानंतरच्या गोष्टींना” खूप मोठा सिलसीला सुरु झाल्याचं दिसतय; “मंगलाष्टक वन्स मोअर” ही कथा देखील लग्नानंतरच्या आयुष्यावर बेतली असून थोडासा वेगळा विषय या निमित्ताने प्रेक्षकांच्या समोर आला असून, एंटरटेनमेंट ची हमखास गॅरंटी असं सांगता येईल; त्यासोबतच सुरेल संगीत, बॅकग्राउंडला आलेली गाणी, आणि दिलखेचक संवाद यामुळे सिनेमा श्रवणीय आणि रोमॅण्टीक देखील बनलेला दिसून येतो.

या चित्रपटाची कथा थोडक्यात सांगायची तर सत्यजीत (स्वप्निल जोशी) आणि आरती (मुक्ता बर्वे) यांचा प्रेमविवाह झाला आहे. सत्यजीत एका रेडिओ वाहिनीत “मार्केटिंग डिपार्टमेंट” मधे मोठ्या पदावर कार्यरत आहे, आरती ही एक गृहिणी आहे! लग्ना आधीच्या आणि लग्ना नंतरच्या सध्याच्या आयुष्यात सत्यजीतच्या वागणुकीत कमालीचा फरक जाणवतोय, आरती अजुनही त्याची मनापासून काळजी घेते आहे, जीवापाड जपते आहे आणि त्याला सर्वस्व मानणारी अशी भूमिका तीनं समर्थपणे पडद्यावर साकारली आहे. पण अति काळजीमुळे किंवा सारखा सारखा उपदेश करण्यामुळे देखील नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, नेमकी अशीच कथा आपल्या समोर “मंगलाष्टक…. च्या” निमित्ताने समोर येत आहे; पण सतत एकत्र असण्यापेक्षा त्या व्यतिरिक्त काहीकाळ तरी नवरा, बायकोनी एकमेकांना स्पेस दिल्यास नात्याचे बंध दृढ होऊ शकतात का ? हे इंटरव्हल नंतर आपल्याला पहायला मिळतं.
“मंगलाष्टक वन्स मोअर” आजच्या काळातील तरुणाईचं मन, इच्छा-आकांक्षा, त्यांचे प्रोफेशनल व पर्सनल प्रश्न, प्रेमाच्या संकल्पना सांगणारा सिनेमा असल्यामुळे आपल्याला जवळचा वाटत राहतो कारण त्यातून सत्य देखील प्रगट होतं; अअणि म्हणूनच हा सिनेमा काहीसा वेगळा ठरतो.
छायांकन, कलाकारांची निवड, तांत्रिक बाजू, संगीत, विषय आणि दिग्दर्शन, भक्कम असलं तरीसुद्धा अशक्त पटकथेमुळे चित्रपट विस्कटतो, तरीपण मूळ विषया पासून कथा लांब जात नाही हे विशेष.
या चित्रपटात शालिनी (सई ताम्हणकर), रेवा (कादंबरी कदम) यांच्या भूमिका देखील महत्वाच्या व सिनेमात छाप पाडूब जातात, पण (हेमंत ढोमे) ची व्यक्तिरेखा थोडीशी नाटकीच झाली आहे आणि त्याचे संवाद हे पाठांतर केल्यासारखे वाटतात.
आणखीन महत्वाचा उल्लेख इथे करायला हवा, स्वप्निल जोशी ह्याने आणि मुक्ता बर्वेने आरतीची भूमिका अक्षरश: जिवंत केली आहे, दोघांचा सहजपणे असलेला वावर आणि “युथफूल लुक” यामुळे हा सिनेमा खुलला आहे.
शेवट देखील “रोमॅण्टीक” आणि “इमोशनल” नी परिपूर्ण असल्याने आपली उत्कंठा देखील शिगेला पोहचणारी अशीच असते, तेव्हा चित्रपटाची व कलाकार जोडीच्या भूमिकांची तुम्हाला ही उत्सुकता तुम्हाला पण लागून राहिली असेल, मग अधिक वेळ न दडवता हा सिनेमा लवकरात लवकर पहा इतकच “मंगलाष्टक……” च्या निमित्ताने सांगेन.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..