नवीन लेखन...

मंगलाष्टक : वरमाला

यासाठी केला होता अट्टहास असे बिरुद या सोहळ्यास देण्यास हरकत नाही, असा महत्वाचा विवाहसंस्कार लग्नविधी म्हणजे मंगलाष्टक. मंगलाष्टकांशिवाय लग्न लागले हे शास्त्रसंमत होत नाही. आंतरपाटाच्या दोहोबाजूला रुबाबदार नवरा आणि अधोमुखी गौरवर्णा अलंकार पुष्पमंडित सालंकृत नवरी उभे असतात. पौराहित्य करणाऱ्या ब्राह्मणाच्या शात्रोक्त मंत्रोच्चाराने नांदी होऊन नातेवाईक देखील एकेक करीत पाच, सात मंगलाष्टकांमधून देवदेवतांना, निसर्ग देवतांना, पवित्र नद्यांना सहजीवनासाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले जाते. मंगलाष्टकांच्या नादमधुर झंकाराबरोबरच डोईवर पडणाऱ्या पवित्र फुलादी धान्याच्याअक्षतांच्या रूपाने नातेवाईक, सख्या सोबत्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छाने वधु-वर प्रसन्न होतात. शेवटची मंगलाष्टक ‘वाजंत्री बहू गल्बला न करणे’ संप्पन्न होते. आंतरपाट दूर होतो. हा अत्यंत नाजूक क्षण असतो. नववधु शिर झुकलेल्या वराच्या गळ्यात वरमाला घालते आणि नंतर वर-वधूच्या गळ्यात पुष्पमाला घालतो. वधु-वर मंत्रमुग्ध होतात. मंगलाष्टकांतील आवाहनानुसार गगनातून देव आशीर्वाद द्यावयाचा क्षण मंगलमय वाद्याने वातावरण भारून टाकतो. लग्नसभेत आनंदीआनंद होतो.
परंतु अलीकडच्या काळात या मंगलमय पवित्र धीरगंभीर धार्मिक सोहळ्यास, थट्टामस्करीच्या नावाने गालबोट लावणारी प्रथा रूढ होऊ लागली आहे. मित्रमंडळी, नातेवाईकांच्या फाजील उत्साहाने आणि खोट्या प्रतिष्ठेच्या आविष्काराने या वरमाला अपर्णाच्या मंगलमय भावूक क्षणांचा चोळामोळा करताना वधु-वराला उचलून घेऊन त्यांना हार घालण्यापासून परावृत्त करण्याची दांडगाई केली जातेय. या चढाओढीत विवाहसंस्काराचे पावित्र्य आणि गांभीर्य सहजी नजरेआड केले जातेय. आपण आपल्याच सहकारी वधु मैत्रिणीचे आणि वर मित्राचे भावविश्व क्षणार्धात उधळतो आहे याची पुसटशी जाणीव या सवंगड्यांना का नसावी बरे! मग गदिमांच्या ओळींची पुन्हा आठवण येते.सीता स्वयंवराचे किती विलोभनीय दृश्य रेखाटले आहे या वरमाला अर्पण सोहळ्याचे.

आकाशाशी जडलें नातें धरणीमातेचें
मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
पुढे गदिमा, सीतेच्या लज्जेचे मार्मिक वर्णन करतात,
फुलुं लागलें फूल हळूहळू गाली लज्जेचें
उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
मुक्त हासतां, भूमीकन्या मनोमनीं लाजे
आणि तो वरमाला अपर्णाचा अधीर क्षण काय वर्णावा
पित्राज्ञे उठे हळुं ती मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें
आणि झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजीं देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे
स्वयंवर झाले सीतेचे…

आपण प्रत्येकाने अशा चुकीच्या प्रथांना मुळातूनच पायबंद घातला पाहिजे. पुढील पिढीच्या समाजमनावर होऊ घातलेले वाईट परिणाम रोखण्यासाठी, हिंदू संस्कृतीच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी या कुप्रथेविरुद्ध विरुद्ध व्यापक जनजागृती करावयास हवी. इंग्रजाळलेल्या आजच्या तरुण, हिंदू मराठी पिढीसमोर आदर्शवादी आणि विवेकपूर्ण लग्नसोहळे संपन्न होऊन, आजच्या तरुणाईला स्वैर वृत्तीपासून परावृत्त करायला हवे.

लेखक : घनश्याम परकाळे

श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/

किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/-

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..