तारूण्याच्या उंबरठ्यावरी, ज्योत प्रेमाची पेटून जाते
बाह्यांगाचे आकर्षण परि, वयांत त्या भूरळ घालते…१,
प्रेमामधली काव्य कल्पना, शरिर सुखाच्या नजीक ती
किंचित होतां देह दुर्बल त्याच प्रेमाची घृणा वाटती…२,
प्रेम हवे तर प्रेम कर तूं, मूळे असावी अंतर्यामी
मना मधली ओढ खरी ती, येईल अखेर तीच कामीं…३,
अंतर्मनातील प्रेम बंधन, नाते त्याचे अतूट असते
देहामध्यें बदल घडूनही, प्रेम मनींचे फुलत राहते….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply