नवीन लेखन...

आघाडीच्या लोकप्रिय गायिका मंजूषा कुलकर्णी-पाटील

मंजूषा कुलकर्णी-पाटील यांची तब्बल दोन दशकांहून अधिक सांगीतिक कारकिर्द आहे. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९७१ रोजी सांगली येथे झाला. थेट काळजाला भिडणारा स्वर, लांब पल्ला असणाऱ्या आणि दाणेदार ताना, तारसप्तकातील स्वरांची सहज फिरत, सुरांवरची घट्ट पकड, गायनाकडे पाहण्याची सौंदर्यपूर्ण दृष्टी आणि त्यामागचा विचार नेमका पोहोचवण्याची हातोटी या वैशिष्ट्यांमुळे मंजूषा पाटील या सातत्याने देशभरातील रसिकांची दाद घेत आल्या आहेत. मुर्ती लहान पण किर्ती महान याची प्रचिती त्यांचे गायन ऐकल्यावर येते. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच ठुमरी, दादरा, अभंग आणि नाट्यसंगीत या प्रकारांमध्येही आपले नाव कोरले आहे. मूळच्या सांगलीच्या असलेल्या व पुण्यात स्थाईक झालेल्या मंजूषा पाटील कुलकर्णी यांनी पंडित चिंतूबुवा म्हैसकर यांच्याकडून गायनाचे प्राथमिक धडे गिरवले.

मिरजेच्या ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया’तून त्या संगीत विशारद झाल्या. त्यानंतर, त्यांनी हिंदी या विषयातील पदवीसह कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून संगीतातही सुवर्णपदकासह मास्टर्स पदवी संपादन केली. देशभरातील प्रसिद्ध संगीत स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवणाऱ्या मंजूषा यांच्या गायनाकडे इचलकरंजीचे संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा यांचे एकदा लक्ष गेले. मग त्यांच्याकडील मार्गदर्शन हाच मंजूषा यांच्या गायन कारकिर्दीतील निर्णायक टप्पा ठरला.

काणेबुवांकडे मंजूषा यांनी आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे रीतसर शिक्षण घेतले. त्यानंतर पंडित नरेंद्र काणेकर आणि त्यानंतर डॉ. विकास कशाळकर यांचेही मार्गदर्शन मंजूषा यांना लाभले. त्यांनी पंडित उल्हास कशाळकर यांच्याकडे गायनाचे अध्ययन केले आहेत. त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. संगीतकार राम कदम पुरस्कार , पंडित रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, पंडित जसराज गौरव पुरस्कार , विदुषी माणिक वर्मा आणि विदुषी मालती पांडे पुरस्कार, षण्मुखानंद संगीत शिरोमणी पुरस्कार , संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार’, राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

सवाई गंधर्व संगीत महोत्सव, ग्वाल्हेरचा तानसेन समारोह, चंदीगढचे आकाशवाणी संगीत संमेलन, धारवाडचे उस्ताद रहमत खाँसाहेब महोत्सव अशा देशभरातील विविध ठिकाणच्या मान्यताप्राप्त संगीत महोत्सवांमध्येही त्यांनी आपले गायन सादर केले आहे. लंडन, बांगलादेश, शिकागो, मस्कत, अमेरिका, सिंगापूर येथेही त्यांनी अनेक मैफली रंगनव्या आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..