देशात झालेला शिक्षणप्रसार, त्यातही इंग्रजीचा पगडा, सुलभ ट्रॅंव्हेलींग, पाश्चिमात्य जीवनशैलीचा प्रभाव आणि तीचे अनुकरण करण्याचा आपला आंधळा प्रयत्न, जीवनाच्या सर्वच अंगांचे यांत्रिकीकरण करण्याचा हट्ट यामुळे आपल्या संस्कृतीतले मनाला आणि शरीराला पवित्र करणारे कितीतरी सण/प्रथा विकृत होत चालल्यात, लोप पावत चालल्यात..!
कोजागीरी ही त्यापैकी एक..
कोजागीरी साजरी करण्यामागची पवित्र ‘अंधश्रद्ध’ कधीच लोप पावली आणि दुधाची जागा दारूने घेतली. मुंबईत काय किंवा ग्रामिण भागात काय, केबल आणि बार संस्कृतीच्या प्रसारामुळे जाग्रण करण हे नित्याचंच झालेलं आहे..अशा परिस्थितीत आता कोजागीरी हे हक्काने जाग्रण करण्याचं एक ‘साधन’ म्हणून उरलं आहे..चंद्रप्रकाश आणि त्यातही चंद्रप्रकाशात न्हालेलं दुध आणि त्याचा आरोग्याला होणारा लाभ ही कोजागीरी साजरी करण्यामागची पवित्र भावना कुठेही उरलेली नाही..कोजागिरी पैर्णिमेला लहान मुलांना दिव्या-कापसाने ओवाळायची प्रथा काही ठिकाणी आहे..दिव्यासारखा/सारखी प्रकाशमान हो आणि कापसा सारखा म्हातारा हो (केस साफ पिकोत) हे सांगणारी प्रथा आता कुठेतरी अभावानेच शिल्लक असेल..
मुळात पालकांनाच आताशी आपले सण-समारंभ-उत्सव-प्रथा हे सर्व हास्यास्पद वाटू लागल्याने त्यांच्या वंशजांना ते टाकावू वाटले तर नवल ते काय..!
हे सण/प्रथा साजरे करण्यामागची आपल्या पूर्वजांच्या उदात्त भावनांची, त्यामागील संकेंतांची आपण कळत- नकळत पायमल्ली करतोय याचं भान आपल्याला आहे की नाही कुणास ठाऊक..!
आपण वेळीच यावर विचार केला नाही तर आपल्या पुढच्या पिढीला एक अत्यंत निरस, यंत्रवत जीवन जगावं लागणार आहे..हे सण/समारंभ नेहेमिचे आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या वंगणाच कार्य करतात..आणि वंगणच नसेल तर जीवनचक्राचं गाडं खडखडाट करणारच आणि एक दिवस अकाली तुटून पडणार..
पाश्चात्य देशात जीवनातल्या अती आधुनिकीकरणाने फ्रस्ट्रेशन येऊन तरूण/तरूणींमध्ये आत्महत्या वाढत चालल्याचं पेपरमधे वाचायला मिळतं..आपल्या देशातही हे प्रमाण वाढत चाललं आहे..आपण पाश्चात्य जीवनशैलीच्या नादाला लागून आपल्या प्रथा-परंपरांना वेडगळ समजून तिलांजली देत आहोत त्याचाच तर हा परिणाम नसावा..?
किमान आपल्यापुरत्या तरी या प्रथा परंपरा जिवंत ठेवता येतील का याचा प्रत्येकाने विचार आणि प्रयत्न केला तरी या प्रथांना जीवनदान मिळू शकेल असं वाटतं..
— गणेश साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply