एखाद्याने आपल्याकडील शिगोशिग भरलेल्या भांड्यातून वाटीभर दुध मित्राला देणं आणि त्या मित्राची कुवतच वाटीची असताना, त्या पहिल्या ‘एखाद्या’ मित्राच्या अडचणीच्या वेळेस दुधासहीत अख्खी वाटीच त्याला देऊन टाकणे, यातील त्या ‘देण्या’ला परतफेड म्हणावं की आणखी काही हे माझ्या लक्षातच येत नाहीय..यातील वाटीच्या मालकाचं देणं मोठं की भरलेल्या भांड्याच्या मालकाचं?
आणखी स्पष्ट करून सांगतो.
ज्याच्याकडे पोह्यांपेक्षा जास्त दौलत नाही अशा सुदाम्याने त्यचा मित्र कृष्णाला ते पोहे प्रेमाने देऊन टाकले. अवघ्या वसुंधरेचा मालक असलेल्या योगेश्वर कृष्णाने त्यवर सुदाम्याला एखादा वाडा, काही गो-धन, सोनं-नाणं दिलं. याला निव्ळ परतफेड म्हणता येईल का? सुदाम्याचं देणं मोठं की कृष्णाचं?
माझ्या मनातला हा गुंता सुटता सुटत नाहीय कारण त्या वाटीचीच मालकी असलेला तो मित्र पुढे जर काही अडचणीत आला तर शिगोशिग भरलेल्या भांड्याचा मालक मित्र, “मी परतफेड केलीय” असं स्वत:शी बोलून गप्प राहू शकतो का?
देण्याचा किंवा परतफेडीचा विचार केला तर मग ती ‘मैत्री’ म्हणावी का हा आणखी एक उपप्रश्न..
— नितीन साळुंखे
9321811091
astroganesh.in
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply