२२ डिसेंबरला मुंबईत पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगांव या दोन स्टेशनमधील ‘राम मंदीर’ या नविन रेल्वे स्टेशनचे उद्घाटन झाले.
‘राम मंदीर’ हे नांव या नविन स्टेशनला दिलं हे चांगलच झालं यात दुमत नाही. पण सारा परिसर पूर्वीपासून ‘औशिवरा’ या नांवाने प्रख्यात आहे. मला वटातं ‘ओशिवरा’ हे नांव ‘ओम शिव हरा’ या भगवान शंकराच्या नांवाचा अपभ्रंश असावा. कारण आताच काही दिवसांपूर्वी गोरेगांच्या प्रसिद्ध राम मंदीर परिसरात मंदीरा पेक्षा प्राचिन शिव मंदीराचे अवशेष सापडले अशी एक फोटोसहीत बातमी ‘दै. लोकसत्ता’त दि. १३ डिसेंबरला पहिल्याच पानावर आली होती. ‘ओशिवरा’ हे नांव ‘ओम शिव हरा’चा अपभ्रंशच असावा असं माझ्या मनात राहून पाहून येतंय..
‘राम मंदीर’ काय किंवा ‘ओम शिव हरा’ काय, दोन्ही आपलीच दैवतं आहेत. तरीही ‘रामा’चं नांव दिल्याने रामापेक्षा पुरातन असलेल्या ‘शंकरा’वर आपण नकळत अन्याय केलाय की काय अस मला वाटतं..
दि. १३ डिसेबरच्या लोकसत्तातील बातमी आपल्याला इथे वाचता येईल.
शिवमंदिरामुळे ‘राम मंदिरा’पुढे नामप्रश्न http://www.loksatta.com/mumbai-news/ram-mandir-station-name-issue-1360555/
— नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply